शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मागे

By admin | Updated: August 10, 2016 00:24 IST

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या आश्वासानंतर

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या आश्वासानंतर मंगळवारी जिल्ह्यातील दुकानदारांनी संप मागे घेतला़ त्यामुळे जिल्ह्यातील धान्य पुरवठा सुरळीत झाला असून, दुकानांत धान्य पोहोच केले जाणार आहे़जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्री परवाना धारकांनी १ आॅगस्टपासून बंद पुकारला होता़ त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून धान्य वाटप बंद होते़ या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ या बैठकीत शेवगाव येथील संघटनेचे देविदास देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीनंतर संप मागे घेतल्याची घोषणा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या आयोजित मेळाव्यात केली़ स्वस्त धान्य दुकानदार विके्रता संघाचे शहराध्यक्ष प्रकाश हापसे, उपाध्यक्ष बार्शीकर, बाळासाहेब दिघे, निलेश दारुणकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते़ बैठकीदरम्यान पारदर्शी कारभार हा शासनाचा हेतू आहे़ बायोमेट्रीक पद्धतीमुळे धान्य वितरणात पारदर्शकता येणार असून, गरजूंना धान्य मिळणार आहे़ त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना अत्यंत तुटपुंजे उत्पन्न मिळते़ त्यात वाढ व्हावी, यासाठी सरकारने पावले उचलली असून, मानधन वाटपाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दुकानदारांना दिले़ शिंदे यांच्या झालेल्या चर्चेनंतर शहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी संप मागे घेतला असून, धान्याचे चलन भरण्यास सुरुवात केली आहे़ पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना गहू व तांदूळ वाटप करण्यात येणार असून, तूरडाळीचेही शिधापत्रिकेवर वाटप करण्यात येणार आहे़ जिल्हा पुरवठादाराकडून तूरडाळीचा पुरवठा तालुक्यातील गोदामात पोहोच करण्यात येणार आहे़चलन भरल्यानंतर तूरडाळ दुकानदारांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले़(प्रतिनिधी)