शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चाँदबिबीच्या विश्रामगृहाचे झाले खंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:03 IST

साहेबराव नरसाळे अहमदनगर : चहूबाजूंनी वाढलेले गवत, खुरट्या झाडांचा वेढा, पडलेल्या भिंती, ढासळलेले घुमट, मद्याच्या बाटल्यांचा खच आणि पावसाचे ...

ठळक मुद्देआठ भागात ही वास्तू विखुरलेली असून, बागेतच अष्टकोनी महल बांधण्यात आला आहे.ही बाग गुलाबपुष्पांनी नटलेली असायची. हुसैन निजामशहा यांची मुलगी चाँद सुलताना यांचे विश्रांतिस्थान व हमामखाना (अंघोळीचे ठिकाण) होते.जेथे एकेकाळी गुलाबपुष्पांचा सुगंध दरवळत होता, त्या हमामखान्यात आता उग्र दुर्गंधी पसरलेली आहे.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : चहूबाजूंनी वाढलेले गवत, खुरट्या झाडांचा वेढा, पडलेल्या भिंती, ढासळलेले घुमट, मद्याच्या बाटल्यांचा खच आणि पावसाचे साचलेले डबके अशी भग्नावस्था झाली आहे, हस्त बेहस्तबाग महल या अहमदनगरमधील दुस-या क्रमांकांच्या ऐतिहासिक वास्तूची!अहमदनगरच्या इतिहासात पहिल्या क्रमांकाची वास्तू म्हणून भुईकोट किल्ल्याकडे पाहिले जाते़ त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो हस्त बेहस्त बाग महालाचा. अहमद निजामशाह यांनी १५०६ मध्ये ही दुमजली ऐतिहासिक वास्तू उभारली़ ही वास्तू फैजबक्ष महल म्हणून ओळखली जात होती़ पुढे या महालाला हस्त बेहस्त बाग म्हणून ओळखले जाऊ लागले़ आता त्याचाही अपभ्रंश करीत भिस्तबाग महाल नावाने ही वास्तू ओळखली जात आहे.आठ भागात ही वास्तू विखुरलेली असून, बागेतच अष्टकोनी महल बांधण्यात आला आहे. या महालाभोवती पूर्वी चहूबाजूंनी जलाशय होता. या जलाशयात पिंपळगाव माळवी येथील तलावातून खापरी नळाद्वारे पाणी आणण्यात आले होते. ही बाग गुलाबपुष्पांनी नटलेली असायची. ही वास्तू हुसैन निजामशहा यांची मुलगी चाँद सुलताना यांचे विश्रांतिस्थान व हमामखाना (अंघोळीचे ठिकाण) होते.विजापूरनंतरचे दुसरे सौंदर्यस्थळ असा दर्जा या वास्तूला लाभला होता़ मात्र, ही वास्तू आता पूर्णपणे ढासळली आहे़ जुगारी, मद्यपींचा अड्डा झाली आहे. महालातील गुलाबपुष्पांनी नटलेला जलाशय आता पावसाचे पाणी साचून गटार झाला आहे़ त्यात विविध प्रकाराची खुरटी झाडे उगवली असून, संपूर्ण महालाला गवताने वेढले आहे़ प्रवेशद्वाराच्या सर्वच भिंती ढासळलेल्या असून, छत केव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था आहे़ जेथे एकेकाळी गुलाबपुष्पांचा सुगंध दरवळत होता, त्या हमामखान्यात आता उग्र दुर्गंधी पसरलेली आहे. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़हे करता येईल...बेहस्तबाग महालाचे पुनरुज्जीवन करून येथे पूर्वीसारखाच सुंदर जलाशय, त्यात नौकानयन, गुलाबपुष्पांसह इतर सुंदर फुलांनी युक्त असा बगीचा, लेझर शो करून हे ऐतिहासिक स्थळ उजागर करता येऊ शकेल़ महापालिकेला किंवा संबंधित यंत्रणेला त्यातून मोठा महसूल मिळवता येईल़ मात्र, त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे़प्रशासनाने केले हात वरभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपमंडळ नगरमध्ये आहे़ मात्र, या कार्यालयाकडे या ऐतिहासिक वास्तूची नोंदच उपलब्ध नाही़ ते आमच्याकडे नाही, असे सांगत पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली आहे़ तर जिल्हा प्रशासनानेही या जागेचा वाद पुढे रेटत तेथे विकास करणे अशक्य असल्याचे सांगितले़जागेचा वाद कोर्टातबेहस्त बाग महल ही ऐतिहासिक वास्तू खासगी जागेत असल्याचा दावा करीत हा वाद कोर्टात गेला आहे़ तर काही मंडळींनी ही ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे ती पुरातत्त्व विभागाकडे वर्ग करावी, अशी मागणी केली आहे़ मात्र, याबाबत अद्याप कोर्टातून निर्णय झालेला नाही़ त्यामुळे शहराच्या ५२८ वर्षांच्या इतिहासात या ऐतिहासिक वास्तूचा कोणताही विकास आराखडा तयार होऊ शकला नाही़बेहस्त बाग महालाची डागडुजी करून तेथे विकास झाला पाहिजे, अन्यथा पुढील पिढ्यांना बेहस्त बाग महाल फक्त छायाचित्रांमध्येच पाहावा लागेल़ अहमदनगरचे हे सौंदर्य नष्ट होत आहे़ ते वाचविण्यासाठी समाजाची एकजूट होणे आवश्यक आहे़-जयंत येलूलकरपर्यटनाच्या दृष्टीने अहमदनगरमधील ऐतिहासिक स्थळांचा विकास होणे गरजेचे होते़ मात्र, दुर्दैवाने ते झाले नाही़ हा ऐतिहासिक खजिना ज्याला पाहिजे त्याने तसा लुटला आहे, याची ना प्रशासनाला खंत, ना राजकारण्यांना! बेहस्तबाग महालाचा विकास करून पर्यटनस्थळ केल्यास महापालिकेला किंवा संबंधित यंत्रणेला मोठा महसूल मिळू शकेल़ पर्यटकांची संख्या वाढेल़ मात्र ती दूरदृष्टी असलेला अधिकारी किंवा राजकारणी येथे नाही़-नवनाथ वाव्हळ, इतिहास संशोधक