शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर वसुलीस श्रीरामपूर न्यायालयात आव्हान

By admin | Updated: April 8, 2017 18:22 IST

नगरपालिका व महानगरपालिकांचे मालमत्ता कर आकराणीचे अधिकार काढून यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कर मंडळ स्थापन करुन मूल्य आधारित करप्रणाली सुरु केली.

आॅनलाईन लोकमतरमेश कोठारी / श्रीरामपूर (अहमदनगर), दि़ ८- महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांचे मालमत्ता कर आकराणीचे अधिकार काढून यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कर मंडळ (म्युनिसिपल टॅक्स बोर्ड) स्थापन करुन मूल्य आधारित करप्रणाली सुरु केली. त्यामुळे मालमत्ताधारकांच्या करात मोठी वाढ झाली आहे. या कायद्यास श्रीरामपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले आहे. श्रीरामपूरचे मालमत्ताधारक समित मुथा, शांतीलाल पोरवाल, अशोक कोठारी, ज्ञानदेव रोडे यांच्या वतीने अ‍ॅड. सुभाष कोठारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात जिल्हाधिकारी, श्रीरामपूर पालिकेचे प्राधिकृत मुख्य निर्धारण अधिकारी, नगररचना लवाद आदींना प्रतिवादी केले आहे.याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष कोठारी यांंनी याबाबत सांगितले की, १३ व्या वित्त आयोगाने मूल्य आधारित करप्रणाली अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र मुनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड अ‍ॅक्ट अजून मंजूर करुन घेतले नसल्याने राज्य सरकारला मिळणारे सुमारे ११०० कोटींचे अनुदान मिळू शकणार नाही, असे तेराव्या वित्त आयोगाने निदर्शनास आणले आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात नगरपालिका व महापालिका क्षेत्रात मूल्य आधारित करप्रणाली लागू करण्यासाठी व त्यात सारखेपणा येण्यासाठी महाराष्ट्र म्युन्सिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड अ‍ॅक्ट २०११ विधानसभेत मंजूर केले. त्यास राज्यपालांची मंजुरी मिळवून अनुदानाचे सुमारे ११०० कोटी रुपये मिळविले. यामुळे नगरपालिका, महापालिकांचे अ‍ॅसेसमेंट व रिव्हिजन करुन रेंटेबल व्हॅल्यू निश्चित करण्याचे अधिकार संपुष्टात येऊन टॅक्स बोर्डला अधिकार प्राप्त झाले आहेत.सन २०११ नंतर महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका यांनी मालमत्तांचे केलेले असेसमेंट रिव्हिजन करुन मालमत्ता कराची बिले ही मुळातच अधिकार नसतांना तयार केलेली असल्याने ती बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीर कर बिलाची मागणी जनतेकडून करण्याचा पालिका व महानगरपालिकांना नगरपालिका अधिकार नाही. या निर्णयाविरुद्ध श्रीरामपूर शहरातील स्थावर मिळकतधारकांच्या वतीने श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करुन नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन बळजबरीने सुरु केलेल्या मालमत्ता कर वसुलीस न्यायालयात आव्हान दिले आहे.मालमत्ता कर धारकांवर होत असलेल्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी श्रीरामपूर शहरातील मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराबाबत न्यायालयात २० एप्रिलपर्यंत या याचिकेत सहभागी होऊन हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.