शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील पूल उभारण्यासाठी साखळी उपोषणाला सुरूवात

By शेखर पानसरे | Updated: February 2, 2024 15:25 IST

पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.

संगमनेर : म्हाळुंगी नदीवरील नवीन पूल उभारणीसाठी संगमनेर नगर पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (दि. ०२) म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने तुटलेल्या पुलाजवळ समितीचे सदस्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. पूल खचून १५ महिने उलटले. मात्र, अद्यापही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.श्री स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरापर्यंत हा पूल होता. साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा आदी परिसर तसेच कासारा दुमाला आणि त्यापुढील गावांना हा पूल जोडतो. साई मंदिराच्या शेजारी दिगंबर गणेश सराफ विद्यालय आणि देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. प्रवरा, म्हाळुंगी नदीच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. मात्र, पूल खचल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांना दळणवळणाची मोठी अडचण होते आहे. पुलाच्या कामाची निविदा ५ डिसेंबर २०२३ ला प्रसिद्ध होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून २५ जानेवारीला कार्यारंभ आदेश काढण्यात आला. नवीन पुलाचे उभारणीचे काम हे जोपर्यंत सध्या जुन्या तुटलेल्या पुलावर असलेली पाईपलाईन स्थलांतर करत नाही. तोपर्यंत तुटलेला पूल जमीनदोस्त करून नवीन पूल उभारणीचे काम सुरू करणे अशक्य असल्याचे नगर परिषद प्रशासनाला माहिती असूनही ही पाईपलाईन स्थलांतर कामाची निविदा १९ जानेवारी २०२४ ला प्रसिद्ध करण्यात आली. या दोन्ही निविदा प्रसिद्ध करून पूर्ण करणे यातील वेळ वाया गेला आहे. असेही म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर