शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सुप्यातील कंपनीवर केंद्रीय पथकाचा छापा

By admin | Updated: July 22, 2014 00:09 IST

पारनेर : तालुक्यातील सुपा येथील आम इंडीया कंपनीवर केंद्रीय अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि़ २१) दुपारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे तपासणीचे काम सुरु होते.

पारनेर : तालुक्यातील सुपा येथील आम इंडीया कंपनीवर केंद्रीय अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि़ २१) दुपारी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रे तपासणीचे काम सुरु होते. या कारवाईबाबत अबकारी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयता पाळली असून, कोणतीही माहिती सांगण्यास नकार दिला.सुपा एम.आय.डी.सी. येथे पारनेर रस्त्यावर आम इंडीया कंपनी आहे. सुपा औद्योगिक वसाहतीतील ही सर्वात मोठी कंपनी असून, चारचाकी वाहनांचे अ‍ॅक्सलचे उत्पादन या कंपनीत केले जाते. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे येथून आलेल्या केंद्रीय अबकारी विभागाच्या एका पथकाने आम इंडीया कंपनीत प्रवेश केला आणि तात्काळ कंपनीचे गेट सील केले़ कंपनीतील कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. कंपनीतील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी काम बंद करुन कोणीही बाहेर जाऊ नये, असे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या बाहेरील मुख्य गेटला कुलूप ठोकल्याने कच्चा माल घेऊन आलेली वाहने बाहेरच उभी करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता कार्यालयीन कर्मचाऱ्यांची सुट्टी झाल्यावर त्यांना सोडण्यात आले़ मात्र, कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई केली होती. अंबर दिव्याच्या वाहनात दोन अधिकारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)छाप्याची गोपनियताकंपनीतून तयार होणाऱ्या उत्पादनावर बाहेर पडतानाच कर आकारला जातो़ त्यामध्ये काही तफावत असल्याने यापूर्वी कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती़ पण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली असून, कोण अधिकारी तपास करीत आहेत, याची सुध्दा माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचू दिली नाही़ कंपनीमध्ये अधिकारी पाहणीसाठी येत असतात़ पण केंद्रीय अबकारी कर विभाग व कोणी छापा टाकला याची माहिती नाही. त्याबद्दल काहीही माहिती सांगता येणार नाही.- रवींद्र राऊत, मनुष्यबळ व्यवस्थापक, आम इंडीया कंपनी