शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सोमैया महाविद्यालयास केंद्र शासनाचा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST

कोपरगाव : भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा ...

कोपरगाव : भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित 'एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय' या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता रँकिंग पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एकमेव विजेते ठरले आहे.

महाविद्यालय परिसरातील स्वच्छता, स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न, जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प व त्याचा वापर, हरित संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापन या निकषांच्या आधारे के. जे. सोमैया महाविद्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली आहे.

यादव म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समित्या स्थापन करून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी नियमित केली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन महाविद्यालयात विविध विभागांमार्फत उपक्रम राबवून साजरे केले जातात. महाविद्यालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून महाविद्यालयाच्या शेजारून वाहणार्‍या गोदावरी नदीकाठी असलेल्या वृक्षांना दिले जाते. महाविद्यालय व स्थानिक गोदामाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नदी किनारी 'अंबिका बन' निर्माण केले आहे. या उपक्रमाचे कौतुक जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी स्वतः कार्यस्थळी येऊन केले होते. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी महाविद्यालयात ४ लाख लीटर क्षमतेच्या टाक्या उभारल्या आहेत.

महाविद्यालयाच्या या अहवाल समितीचे सदस्य म्हणून उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, एन. एस. एस. जिल्हा समन्वयक प्रा. शैलेंद्र बनसोडे, एन. एस. एस.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एस. गायकवाड, बी. बी. ए. विभागप्रमुख प्रशांत भदाने, कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संजय दवंगे, संजय पाचोरे यांनी काम पाहिले. या यशाबाबत कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, व्यवस्थापन सदस्य संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयातील सर्वांचे कौतुक केले आहे.