शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमय वातावरणात महावीर जयंती साजरी

By admin | Updated: April 20, 2016 00:09 IST

अहमदनगर : नगर शहरात भक्तिमय वातावरणात भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली़

अहमदनगर : नगर शहरात भक्तिमय वातावरणात भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली़ कापड बाजारातील जैन मंदिरापासून महावीरांच्या नावाचा जयघोष करत निघालेल्या मिरवणुकीत सुशोभित रथ, उंट, घोडे, हत्ती आणि पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ घोड्यावरील स्वार बालक मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले़प़ पू़ आचार्य हर्षवल्लभ सुरीश्वरजी महाराज, प़ पू़ पंन्यास दर्शनवल्लभ विजयजी महाराज यांच्यासह कापडबाजारातील जैन मंदिरापासून मिरवणुकीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला़ मिरवणुकीत पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ लाल व लिंबू रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला भाविकांची संख्या मोठी होती़ ही मिरवणूक अर्बन बँक चौक, घुमरेगल्ली, महाजन गल्लीसमोरील दिगंबर जैन मंदिर, गुजर गल्लीतील आदेश्वर भगवान जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, जुनी छाया टॉकीज, चितळे रस्ता, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी चौक, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, ख्रिस्त गल्ली कारंजा, संगम चौक, मार्केट यार्ड, सहकार सभागृहामार्गे मिरवणूक धार्मिक बोर्डवर दाखल झाली़ मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले़ मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात येत होते़ पिण्याच्या पाण्याचे व खाद्यपदार्थांचे वाटप यावेळी करण्यात आले़ मिरवणूक मार्गावर भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित रांगोळ्यांचे परिक्षण सौ़ शैला गांधी व सरोज कटारिया यांनी केले़ नवीपेठ कोपरा येथे आनंदराम मुनोत, ख्रिस्त गल्ली येथे मीनाताई मुनोत, मार्केट यार्ड चौकात वसंत लोढा यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले़ ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या़ सभेत प़ पू़ प्रखर वक्ते आदर्शऋषी म़ सा़ यांनी स्वागत केले़ गुरुवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली़ प़ पू़ अलोकऋषिजी यांनी भगवान महावीरांच्या जीवनाबाबत माहिती दिली़ जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले़ आभार उपाध्यक्ष संतोष बोथरा यांनी मानले़(प्रतिनिधी)भगवान महावीर यांचे विचार जगातील अराजकता घालविण्यास उपयुक्त ठरतील़ त्यांच्या संदेशातून जगात शांती नांदेल़- प़ पू़ पंन्यास दर्शनवल्लभ विजयजी म़ सा़