शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बरे झालेल्या कोरोना रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

होळी निमित्त घेण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य ...

होळी निमित्त घेण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, किशोर मुनोत, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, कैलाश नवलानी, सुनील थोरात, गोविंद खुराणा, दलजीतसिंह वधवा, कमलेश गांधी, कोविड सेंटरचे डॉ. प्रदीप कळमकर, योगेश तांबे, सुरेखा माळी, आश्‍विनी खरात, कृष्णकांत घोलप उपस्थित होते.

शंकर गोरे म्हणाले, महापालिकेने घर घर लंगर सेवेच्या सहकार्याने दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले आहे. २१० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन एक ते दोन दिवसात आनंद लॉन व शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज येथे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. अजून काही ठिकाणी कोविड सेंटरसाठी जागेची पाहणी सुरु असून, कोणत्याही कोरोना रुग्णांवर उपचार कमी पडणार नसून याची दक्षता घेतली जाणार आहे. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी घरी न थांबता कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे.

...........

कोरोनाचे केले दहन

संध्याकाळी कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारात कोरोनाचे प्रतीकात्मक दहनाची होळी पेटविण्यात आली. घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने ४ मार्चपासून नटराज हॉटेल येथे सर्वांसाठी तर जैन पितळे वसतीगृहात फक्त महिलांसाठी निशुल्क कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये घर घर लंगर सेवेच्या वतीने सर्व रुग्णांना नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमास अहमदनगर पोलीस दल व लायन्स क्लबचे सहकार्य लाभत आहे. कोविड सेंटरमध्ये प्ले रुमची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती वधवा यांनी दिली.