नेवासा : जातीय सलोखा जपत साधेपणाने सामाजिक अंतराचे पालन करत मास्कचा वापर करून भीतीमुक्त वातावरणात बकरी ईद साजरी करा, असे आवाहन नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांनी केले.
शनिवारी (दि. १७) सायंकाळी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात झालेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. विजय करे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. आतापर्यंत शासनाच्या नियमांचे सर्वांनी पालन केले. तसेच पालन बकरी ईदलाही करावे. मशीद तसेच ईदगाह मैदानावर चार ते पाच प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात नमाज अदा करता येईल. इतरांनी घरात बसूनच नमाज अदा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुप्ती साब यांनी शासन नियमांचे पालन करून बकरी ईद सण साजरा केला जाईल. तशी खबरदारी घेतली जाईल, असे आवाहन केले. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, मौलाना मुप्ती रहीम, मौलाना इम्रान अब्बास, मौलाना उस्मान सय्यद, गफूर बागवान, भाजपचे नगरसेवक सचिन नागपुरे, अल्ताफ पठाण, आसिफ पठाण, इम्रान दारूवाले, ॲड. जावेद इनामदार, हारुण जहागिरदार, असिर पठाण, जाकिर शेख, मुस्तकी पठाण, मुश्ताक सय्यद, अन्सार सय्यद, मुसा इनामदार, इम्रान शेख, पत्रकार सुधीर चव्हाण, ‘लोकमत’ तालुका प्रतिनिधी सुहास पठाडे, जालिंदर गवळी, नगरपंचायतचे कर्मचारी योगेश गवळी उपस्थित होते. गोपनीय शाखेचे प्रताप दहीफळे यांनी आभार मानले.