शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांच्या सान्निध्यातच नाताळ सण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST

जामखेड : आरोळे कोविड केअर सेंटर जामखेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची मोफत सेवा करीत आहे. या महामारीमुळे दीड हजारांवर कुटुंबे ...

जामखेड : आरोळे कोविड केअर सेंटर जामखेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची मोफत सेवा करीत आहे. या महामारीमुळे दीड हजारांवर कुटुंबे बाधित झालेली असताना नाताळ सण आनंदात साजरा करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे यावर्षीचा नाताळ कोविड रुग्णांच्या सान्निध्यात साध्या पद्धतीने साजरा करण्यातच आम्हाला आनंद आहे, असे आरोळे कोविड सेंटरचे संचालक रवी आरोळे यांनी सांगितले.

जामखेड शहरातही नाताळचे मोठे आकर्षण असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोणताही समारंभ न करता चर्च न भरवता, केवळ स्नेहाने गाठीभेटी घेत ऑनलाइनवर येशूंचा संदेश रेव्ह. डॉ. शोभा आरोळे यांनी ख्रिश्चन बंधूंना दिला.

याबाबत रवी आरोळे म्हणाले, पद्मभूषण डॉ. रजनीकांत आरोळे व डॉ. मेबल आरोळे या दाम्पत्यांनी २७ सप्टेंबर १९७० साली येथे या प्रकल्पाद्वारे आरोग्य सेवेचे छोटेखानी एक रोपटे लावले होते. आज पन्नास वर्षांत त्याचा विस्तार होऊन विशाल स्वरूप झाले आहे. ते माझे जन्मदाते होते याचा खूप गर्व आहे, त्यांच्या, येशू ख्रिस्तांच्या विचाराने आम्ही दोघे बहीण-भाऊ ही सेवेची धुरा वाहत आहोत. अनंत अडचणी आहेत. मात्र, आई-वडिलांच्या विचारानेच आम्ही घडल्याने आजपर्यंत आरोग्य सेवा गरीब दुबळ्यांना प्रदान करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.