बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून चार दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी युवकांनी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. बेलवंडीसाठी लवकर लसीकरण मोहीम राबविण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष निखिल क्षीरसागर, समता पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील ढवळे, उपाध्यक्ष अश्रुद्दीन हवालदार, संचालक कैलास राऊत, प्रहार संघटनेचे बेलवंडी शाखाध्यक्ष नितीन हिरवे, अशोक लाढाणे, सुनील धनवडे आदींच्या सह्या आहेत.
200821\img-20210820-wa0112.jpg
फोटो- बेलवंडी बुद्रुक ता.श्रीगोंदा येथे आठवड्यातून चार दिवस कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात यावी या मागणीचे निवेदन अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना देताना युवक कार्यकर्ते.