शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरी येथे कालव्याचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:25 IST

महत प्रयासाने अकोले तालुक्यात सुरू झालेले निळवंडे कालव्यांच्या खोदाईचे काम शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पद्मावतीनगर (इंदोरी) येथे संतप्त कालवेग्रस्त शेतकरी आंदोलकांनी बंद पाडले.

अकोले : महत प्रयासाने अकोले तालुक्यात सुरू झालेले निळवंडे कालव्यांच्या खोदाईचे काम शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पद्मावतीनगर (इंदोरी) येथे संतप्त कालवेग्रस्त शेतकरी आंदोलकांनी बंद पाडले. उभ्या पिकात बुलडोझर घालून पीक उद्ध्वस्त केल्याच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. सुमारे दीड तासाने आंदोलकांचा जोश मावळला आणि अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर साडेबारा वाजता काम पूर्ववत सुरू झाले.शुक्रवारी धुमाळवाडीपर्यंत कालव्यांचे रेखांकन करण्यात आले होते. शनिवारी याभागात प्राथमिक पातळवरील कालवे खोदाईचे काम सुरू झाले होते. इंदोरी येथे कालवेग्रस्त कृती समितीच्यावतीने आबाजी चिमाजी धुमाळ, खंडू वाकचौरे, शंकरराव वाळुंज, भाऊसाहेब धुमाळ, भाऊसाहेब वाळुंज, संतोष तिकांडे, शिवाजी कोठवळ, सुनील धुमाळ, देविदास धुमाळ, नामदेव नवले, सचिन जोशी यांच्या नेतृत्वाखाली बुलडोझर पुढे बसत काम बंद आंदोलन केले. कालवे खोदाईचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. न्यायालयाचा अवमान होईल, असे अधिकारी समजून सांगत होते. कार्यकर्ते सुरुवातीला जोशात असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची विनंती धुडकावली.पोलिसांनी आंदोलानातून उद्भवणाºया परिस्थितीची व कोर्ट कचेºयांच्या हेलपाट्यांची जाणीव करून दिली. तलाठी सचिन मांढरे यांनी महसूलकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे सांगितले. पण आंदोलकांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. पोलिसांची कुमक हळूहळू वाढली तशी आंदोलकांची तीव्रता कमी होत गेली. दरम्यान, शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत, सेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ व इतर कार्यकर्ते लग्नाच्या निमित्ताने इंदोरीकडे आले होते. त्यांनी अधिकारी व आंदोलकांशी चर्चा केली. निळवंडे कालव्याचे कार्यकरी अभियंता भरत शिंगाडे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आंदोल-कांची समजूत काढली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर