अहमदनगर : शहरातील बेकायदीशर रिक्षा पूर्णपणे बंद करण्याबाबत संयुक्त कारवाई करावी. परवानाधारक रिक्षांसाठी थांबे निश्चित करून त्या थांब्यावर विनापरवाना रिक्षा येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रिक्षाचालकांनी नियम तोडल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत हयगय करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत. परवानाधारक रिक्षाचालकांचा आठ दिवसांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विनापरवाना रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. यावेळी आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन उपप्रादेश्कि परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी रिक्षाचालकांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, अप्पर पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, शहर वाहतूक शाखेचे सचिन सानप, महामार्ग पोलीस अधिकारी, रिक्षा पंचायतीचे शंकरराव घुले, बाबा आरगडे, केश्व बरकते, विलास कराळे, ताजोद्दिन मोमीन, अशोक औश्ीकर, शेख महंमद, उस्मान खॉ, भगवान जगताप आदी उपस्थित होते.या बैठकीत जिल्हाधिकारी कवडे यांनी शहरातील बेकायदेश्ीर रिक्षा वाहतूक बंद करण्याची कारवाई सध्या सुरू असून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परवानाधारक रिक्षाचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शहरात रिक्षा थांबे करण्यात आले आहेत. या थांब्यावर रिक्षा थांबण्याची परवानगी फक्त परवानाधारक रिक्षाचालकांनाच मिळाली पाहिजे. त्या थांब्यावर विनापरवाना रिक्षाचालकांना थांबण्यास परवानगी देऊ नये,अशी मागणीही रिक्षा पंचायतीने केली आहे. नगर रिक्षा पंचायतीतर्फे रिक्षा चालकांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे घुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बेकायदा रिक्षांविरुद्ध मोहीम
By admin | Updated: August 21, 2014 22:57 IST