शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची आश्वासनांवर बोळवण : बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:46 IST

बेलापूर-परळी या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील महाप्रबंधकांनी जनतेसह खासदारांचीही आश्वासनांवर बोळवण केल्याचे उघड झाले आहे.

कुकाणा : बेलापूर-परळी या रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वेचे मुंबई येथील महाप्रबंधकांनी जनतेसह खासदारांचीही आश्वासनांवर बोळवण केल्याचे उघड झाले आहे.बेलापूर ते परळी मार्गे नेवासा, शेवगाव,गेवराई या रेल्वेमार्गाऐवजी शेवगावपुढे पाथर्डी,राजुरी,रायमोह, बीड या चुकीच्या मार्गाचे सर्वेक्षण करून न परवडणारा सर्वेक्षण अहवाल सादर केला होता. या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबर २०१७ ते ७ डिसेंबर या कालावधीत कुकाणा येथे आमरण उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक दिनेश वशिष्ठ यांनी जून २०१८ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल रेल्वे मंडळास देऊ, असे लेखी दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनीही स्वत: लक्ष घालतो, असे लेखी दिले होते. जून २०१८ ची मुदत संपल्यानंतरही सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याची माहिती महाव्यवस्थापक कार्यालयातून मिळाल्याने कुकाणा येथील रितेश भंडारी, प्रकाश देशमुख, प्रभाकर खंडागळे, राधेश्याम बोरूडे यांनी २० आॅगस्ट २०१८ रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्र्यांनी या रेल्वे मार्गासाठी राज्याचा खर्चाचा वाटा उचलण्याचे पत्र आठ दिवसात केंद्र सरकारला देण्याचे आश्वासन दिले. अडीच महिने उलटूनही अद्यापही पत्र दिले नसल्याचे भंडारी यांनी सांगितले. आत्मदहनाच्या घटनेनंतर ७ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे येथे रेल्वेचे महाव्यवस्थापकांची नगर, पुणे जिल्ह्यातील खासदारांसमवेत बैठक झाली. या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला असता महाव्यवस्थापकांनी ३० सप्टेंबरपर्यंत सर्वेक्षण अहवाल रेल्वे मंडळास पाठविण्याचे आश्वासन खा. लोखंडे यांना दिले. मुदत संपल्यानंतर भंडारी यांनी विचारणा केली असता सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याची लेखी माहिती मिळाली. त्यामुळे महाव्यवस्थापकांनी मुख्यमंत्र्यांसह खासदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.अनेक वर्षांपासून या मागार्बाबत लढा सुरू आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी व नगर दक्षिणच्या खासदारांंना जनता जाब विचारणार आहे. दिवाळीनंतर या रेल्वेमार्गासाठी पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. या आंदोलनात जनतेने रस्त्यावर उतरून सामील होण्याचे आवाहन रितेश भंडारी यांनी केले आहे.जून २०१८ च्या मुदतीनंतर सप्टेंबर २०१८ ची मुदतवाढ घेतली. मात्र ती मुदत संपल्यानंतरही सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. दिवाळीनंतर आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. -रितेश भंडारी, कुकाणा, सचिव, रेल्वे सेवा संस्था, कुकाणा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर