शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

दलित वसाहतींची नगरविकासकडून बोळवण

By admin | Updated: July 5, 2016 23:56 IST

अहमदनगर : नागरी भागातील दलित वसाहतींना अनेक समस्यांनी वेढले आहे़ या वसाहती समस्यामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे़

अहमदनगर : नागरी भागातील दलित वसाहतींना अनेक समस्यांनी वेढले आहे़ या वसाहती समस्यामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे़ मात्र नगरविकास खात्याने अवघ्या तीन कोटींवरच जिल्ह्याची बोळवण केली असून, या निधीचे नगरपालिकांना वाटप करायचे कसे, असा पेच जिल्हाप्रशासनासमोर आहे़ नगरविकास विभागाने चालू अर्थिक वर्षातील दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत निधी मंगळवारी वितरीत केला आहे़ नाशिक विभागातील धुळे, नाशिक शहर, जळगाव आणि धुळे जिल्ह्याला नगरविकास खात्याने झुकते माप दिले आहे़ तुलनेत नगर जिल्ह्यात अवघा ३ कोटी ३० लाखांचा निधी मिळाला आहे़ सर्वात कमी निधी नगर जिल्ह्याला मिळाला आहे़राज्यात क्षेत्रफळाने नगर जिल्हा सर्वात मोठा आहे़ नगर महापालिकेसह जिल्ह्यात नऊ नगरपालिका व पाच नगरपंचायतींचा समावेश आहे़ नागरी भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्या ९ लाख इतकी आहे़ त्यापैकी एकट्या महानगरपालिका हद्दीत अनुसूचित जाती प्रवर्गाची संख्या ४५ हजार ८९५ इतकी आहे़ तर जिल्ह्यातील १४ पालिका हद्दीत ७४ हजार १७७ नागरिक या प्रवर्गातील आहेत़ असे असूनही दलित वस्ती सुधार योजनेेंतून जिल्ह्याला नेहमीच कमी निधी मिळतो, अशी या भागातील लोकप्रतिनिधीची तक्रार आहे़ त्यानुसार जिल्हाप्रशासनाने जास्तीच्या निधीची मागणी केली होती़ परंतु, या मागणीची नगरविकास खात्याने दखल घेतली नाही़ प्राप्त ३ कोटी ३० लाखातून एकट्या महानगरपालिकेला १ कोटी १० लाख दिले जाणार आहेत़ उर्वरित २ कोटी २० लाख १४ नगरपालिकांना वितरीत होणार आहे, याचा अर्थ नगरपालिकांच्या वाट्याला अत्यल्प निधी येणार आहे़ कामांच्या किमती कमालीच्या वाढलेल्या आहेत़ छोटा रस्ता तयार करायचा झाला तरी, त्यासाठी लाखो रुपये लागतात़ मग या निधीतून मोठी कामे होणार कशी असा प्रश्न आहे़ काहीभागात अनेक समस्या आहेत़ दलित वस्तीतून फेरफटका मारल्यास ते दिसूनही येते़ मात्र त्यासाठी आवश्यक असणारा निधी मात्र सरकारकडून मिळत नाही़ परिणामी दलित वसाहतींतील प्रश्न वर्षानुवर्षे जैसे थे आहेत़(प्रतिनिधी)