शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिंगार शहरात केबल वॉर भडकले

By admin | Updated: March 16, 2016 23:57 IST

अहमदनगर : भिंगार शहरातील केबल व्यावसायिकांच्या दोन गटात मंगळवारी सायंकाळी चांगलीच हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

अहमदनगर : भिंगार शहरातील केबल व्यावसायिकांच्या दोन गटात मंगळवारी सायंकाळी चांगलीच हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. सहा जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भिंगार शहरात मंगळवारी सायंकाळी भिंगार आणि आलमगीर येथील दोन गटात तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी रात्री परस्परविरोधात फिर्यादी दाखल केल्या. त्यावरून कॅम्प पोलिसांनी दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख शाकीर अब्दुल गणी (रा. आलमगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज भोयर, संजय छजलानी (रा. भिंगार) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी साडेचार वाजता भिंगार येथील पंचशीलनगरमध्ये शेख गणी यांच्या घराशेजारी राहणारे इम्रान शेख सलीम याचे सूरज भोयर उर्फ सन्नी याचेसोबत वाद झाले होते. यावेळी शेख गणी यांनी मध्यस्थी केली असता आरोपींनी डोक्यात लाकडी दांडके घालून जखमी केले. तसेच संजय छजलानी याने इम्रान शेख याचे हातावर दांडक्याने मारले. तसेच इतर चार इसमांनी मारहाण केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.दुसरी फिर्याद शकुंतला बाबुलाल छजलानी (वय ६५, रा. आंबेडकर कॉलनी, भिंगार) यांनी केली आहे. यात म्हटले आहे की, इम्रान शेख, शेख शाकीर गणी, निस्सार, कोकणे (पूर्ण नाव नाही) व इतर दोन अशा सहा जणांनी जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केली. छजलानी यांच्या घरासमोर सहा जण आले आणि त्यांनी गेटला लाथा मारल्या. फिर्यादिच्या चुलत सून तसेच नातू आकाश याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केली. सदरची मारहाण ही केबल व्यावसायिकांच्या दोन गटामध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.डी. अहिरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)