शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यांच्या ठिकाणांसाठी आता पंधरा मिनिटाला बस

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे.

अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे किमान पंधरा मिनिटे किंवा कमाल अर्ध्या तासाने प्रवाशांना बस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणांहून रात्री आठ-नऊ नंतर अनेक तालुक्यांना जाण्यासाठी बसची सुविधा नाही. यावरही पर्याय योजला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नगरचे विभागीय नियंत्रक अशोक जाधव यांनी सांगितले. ‘प्रशासन ते जनता’ संवाद या ‘लोकमत’च्या उपक्रमात ते बोलत होते. एसटी महामंडळाची स्थापना प्रवाशांना खात्रीशीर, किफायतशीर व सुरक्षित प्रवाशी सेवा मिळण्यासाठी झालेली आहे. त्यासाठीचे सर्व धोरणात्मक निर्णय एसटीचे संचालक मंडळ घेते. नगर विभागाचा विचार केला तर जिल्ह्यात एसटीची सेवा उत्तम आहे. जिल्ह्यातील ११ आगारांतून एसटीचे काम चालते. जिल्ह्यासाठी ७५० बसगाड्या, १४५० चालक, १४७५ वाहक तसेच ८५० तांत्रिक कर्मचारी वर्ग असा एसटीचा राबता आहे. तरीही अजून अडीचशे चालकांची गरज भासते आहे. ते उपलब्ध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. नवीन १०० चालक मिळाले आहेत. त्यामुळे येत्या जुलैपासून निरंतर बससेवा सुरू होणार आहे. तालुका ते तालुका व तालुका ते जिल्हा असा मार्ग त्यातून जोडला जाणार आहे. या मार्गावर सध्या गाड्या आहेत, परंतु त्यात प्रवाशांचा प्रतिक्षा वेळ कमी करण्यात येणार आहे. एस.टी. जाळे जिल्ह्यात विस्तृत करण्याचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)