शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

त्या बस चालक-वाहकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 12:45 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दोन दिवस वांगीपर्यंत का जात नाही? यासंदर्भात चालक व वाहकाची श्रीरामपूर विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली.

राहुरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दोन दिवस वांगीपर्यंत का जात नाही? यासंदर्भात चालक व वाहकाची श्रीरामपूर विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली. दोघांकडून लेखी घेण्यात आले असून वांगीपर्यंत नियमित बस धावणार आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून आठवड्यातील शनिवारी व रविवारी होणारे बसचे खंडित धावणे नियमित होणार असल्याने प्रवाशी वर्गाने स्वागत केले आहे.एका मंत्र्याच्या पीएच्या पत्नीसाठी धावते बस असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच पाथरे परिसरात वाचक ांनी सामूहिक वाचन केले़. पाथरे बस वांगीपर्यंत का जात नाही? यासंदर्भात चालक सोनबा वायळ व वाहक बाळू बिडवे यांची श्रीरामपूर विभागीय कार्यालयातील डेप्युटी मॅनेजर बाळासाहेब शिंदे यांनी चौकशी केली. तुम्ही वांगीकडे का गेले नाही? असा प्रश्न वाहक चालकांना करण्यात आला. वांगीपर्यंत बस धावत नसल्याचे अखेर उघड झाले. त्यानंतर वाहक व चालकाचे लेखी घेऊन त्यांना समज देण्यात आली. यापुढील काळात नियमित बस वांगीपर्यंत जाईल, असे परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले. शनिवारी व रविवारी पाथरेवरून वांगीकडे बस जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देठे यांनी ‘लोकमत’कडे सांगितले होते. याशिवाय शुटींग काढून पाठपुरावा केला होता. परिवहन महामंडळाचे वाहक, चालक बस वांगीपर्यंत नेत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय चव्हाट्यावर आली होती.कुणाही एका व्यक्तीने मागणी केल्यास बससेवा सुरू केली जाते. त्यानुसार करण्यात आलेल्या मागणीनुसार बससेवा सुरू करण्यात आली. बसच्या चालक व वाहकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून लेखी घेतले आहे. ‘लोकमत’चे कात्रण व त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. यापुढील काळात नियमितपणे बससेवा वांगीपर्यंत सुरू राहील.-विलास गोसावी, राहुरी स्थानक प्रमुख, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी