शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

घरफोडी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:50 IST

शहरातील विविध भागांत घरफोडी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी तोफखाना पोलिसांनी जप्त केली. तारकपूर बसस्टॅडजवळ वर्दळीच्या ठिकाणी या चोरट्यांनी कपूर कन्स्ट्रक्शन कंपनी या दुकानात चोरी करून तेथील तिजोरी, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.

अहमदनगर : शहरातील विविध भागांत घरफोडी करणारी अट्टल चोरट्यांची टोळी तोफखाना पोलिसांनी जप्त केली. तारकपूर बसस्टॅडजवळ वर्दळीच्या ठिकाणी या चोरट्यांनी कपूर कन्स्ट्रक्शन कंपनी या दुकानात चोरी करून तेथील तिजोरी, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याशिवाय पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने तेथील सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेले. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासात आय्युब कासम सय्यद (कोठला झोपडपट्टी) व अजयसिंग पोपटसिंग परदेशी (वंजार गल्ली) यांना पकडले. तपासात त्यांचे साथीदार टकलू उर्फ इसरार शेख व वसिम शेख हे अट्टल घरफोडी करणारे गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. यातील आरोपी परदेशी हा कपूर कन्स्ट्रक्शन या दुकानात कामाला होता. त्याचे मालक गावाला गेल्याची संधी हेरून त्याने साथीदारांकरवी या दुकानात चोरीचा कट रचला. यातील आय्यूब सय्यद हा लोखंडी कपाट रिपेअरची कामे करतो. त्यामुळे त्याला दुकान फोडण्यासाठी कटात सहभागी करून घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून हातोडी, कटावणी, अवजड तिजोरी, कार व तिजोरीचा दरवाजा कापण्यासाठी वापरलेली वेल्डिंग मशीन असा एकूण २ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.तिजोरी नाल्यातून हस्तगतपुराव नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी चोरलेली तिजोरी व सीसीटीव्ही डीव्हीआर बुरूडगाव येथील नाल्यामध्ये टाकले होते. पोलिसांनी ते या गटारातून हस्तगत केले. यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस