---------
गांजीभोयरे येथे ३ लाखांची घरफोडी
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे (ता. पारनेर) येथे घरफोडीत ३ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी किशोर हरिभाऊ खोडदे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. २० ॲागस्ट रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खोडदे यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील व सुटकेसमधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ३ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला.
-------------
मोटारसायकलची चोरी
अहमदनगर : शहरातील शासकीय आयटीआय काॅलेजसमोरून १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली. याप्रकरणी किरणकुमार अशोकराव जाधव (वय ३२, शिवाजीनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १९ ॲागस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाधव यांची १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच ११ बीएफ ६२९७) आयटीआय काॅलेजच्या गेटसमोरून चोरीला गेली.
---------------
चंदनाच्या झाडाची चोरी
अहमदनगर : वाळकी येथून १५ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी विश्वनाथ भाऊ भालसिंग (वय ८०, रा. वाळकी, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १६ ते १७ ॲागस्टदरम्यान अज्ञात चोरट्याने भालसिंग यांच्या घराच्या कंपाऊंडच्या आतील १५ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कापून नेले.