शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची सत्ता गेल्यानंतर अंदाजपत्रक खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 11:30 IST

महापालिकेच्या निम्म्या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी कात्री लावली होती़ मात्र महापालिकेत भाजपची सत्ता येताच उर्वरित ५० टक्के अंदाजपत्रक खुले करण्याच्या हालचाली सुरू आहेत़

अहमदनगर : महापालिकेच्या निम्म्या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी कात्री लावली होती़ मात्र महापालिकेत भाजपची सत्ता येताच उर्वरित ५० टक्के अंदाजपत्रक खुले करण्याच्या हालचाली सुरू आहेत़ त्यामुळे सेनेची सत्ता गेल्यानंतर अंदाजपत्रक खुले होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़सन २०१८-१९, या अर्थिक वर्षांतील ५० टक्केच अंदाजपत्रकच खुले केले गेले़ उर्वरित ५० टक्के अंदाजपत्रकाला कात्री लावण्यात आली़ मागील थकबाकीमुळे मंजूर अंदाजपत्रकाला जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी मंजुरी दिली नाही़ उर्वरित अंदाजपत्रक खुले करण्यावरून तत्कालीन महापौर सुरेखा कदम व व्दिवेदी यांच्यात वादही झाले़ परंतु, आयुक्तांनीअंदाजपत्रक खुले करण्यास सपशेल नकार दिला़महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसावी, असा त्यामागील उद्देश होता़ दरम्यान महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली़ महापालिकेत सत्तांतर झाले़ शिवसेना पायउतार होऊन भाजपची सत्ता आली़ परंतु नवीन कामे करण्यासाठी निधी नव्हता़ त्यामुळे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी उर्वरित अंदाजपत्रक खुले करण्याबाबत व्दिवेदी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली़ त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर लेखा विभागाने विकासभार, रेखांकन अंतर्गत सुधारणा आणि चटईक्षेत्र आदी लेखाशीर्षातील कामांना मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे़ तो आयुक्तांना सादर केला जाणार आहे़ आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर कामांचे प्रस्ताव तयार करण्यात येतील़ प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून कामे सुरू करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले़साधारणपणे फेब्रुवारीमध्ये नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार होत असते़ स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ते महासभेत सादर करण्यात येते़ महापालिकेची निवडणूक होऊन एक महिना उलटून गेला़ महापौर व उपमहापौरांच्या निवडी झाल्या़ परंतु, स्थायी समितीच्या सदस्यांची अद्याप निवड झालेली नाही़ या निवडी येत्या फेब्रुवारीमध्ये होतील़ त्यानंतर सभापती निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाईल़विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर सभापतींची निवड होईल़ त्यामुळे सर्व सोपस्कार पार पाडण्यास किमान फेब्रुवारी महिना लागेल़ त्यामुळे अंदाजपत्रक सादर होण्यास विलंब होईल़ त्यात मार्च महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे़त्यापूर्वी विकास कामे सुरू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड सुरू आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर