शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणीला भावांनी फेसबुकवर दिला अखेरचा निरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 13:13 IST

श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लॉकडाऊनमध्ये आपल्या बहिणीच्या अंत्यविधीला त्यांना जात आले नाही. यामुळे अनिल, बाबासाहेब व सूर्यकांत या तिघा बंधूंनी मंगळवारी (दि.५ मे) सकाळी अंत्यसंस्कार समयी फेसबुकवर तिला अखेरचा निरोप दिला.

श्रीगोंदा : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल घोडके यांच्या भगिनी वैजंता दत्तात्रय कदम यांचे सोमवारी अंबरनाथ येथे निधन झाले. लॉकडाऊनमध्ये आपल्या बहिणीच्या अंत्यविधीला त्यांना जात आले नाही. यामुळे अनिल, बाबासाहेब व सूर्यकांत या तिघा बंधूंनी मंगळवारी (दि.५ मे) सकाळी अंत्यसंस्कार समयी फेसबुकवर तिला अखेरचा निरोप दिला. यावेळी त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून बहिणीला अखेरचा दंडवत केला. श्रीगोंदा येथील भीमराव घोडके यांना अनिल, बाबासाहेब, सूर्यकांत, मीना, वैजंता, शोभा असे तीन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.  वैजंता सर्व भावंडाची लाडकी बहीण होती. काही दिवसांपासून वैजंता आजारी होती. लॉकडाऊनमुळे तिला कोणालाही भेटायलाही जाता आले नाही. सोमवारी तिने शेवटचा श्वास घेतला. ही दु:खाची बातमी समजली. तिच्या अंत्यविधीला जाण्याची सर्वांची खूप इच्छा होती.  पण काय करणार? अखेर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्काराचा सोहळा फेसबुकवर लाईव्ह करण्यात आला. घोडके परिवाराने श्रीगोंद्यातून तिला अखेरचा निरोप दिला. वैजंता तु आम्हाला पुन्हा भेटणार नाही म्हणून दाटलेल्या भावनांना सर्वांनी अश्रूंरुपी वाट मोकळी करून दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्या