श्रीगोंदा : अजनूज (ता.श्रीगाेंदा) येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.चद्रकांत गायकवाड यांचे तीन महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यांचा मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रातील मित्रांनी दोन लाखांची मदत शुभांगी गायकवाड यांच्याकडे सुपुर्द केली.
डॉ.चंदू गायकवाड हे त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख आधार होते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्यामागे दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. मदतीसाठी श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, शेवगाव, पुणे, बीड जिल्हा आणि संपूर्ण राज्यातील व्यवसाय बंधूंनी मदतीसाठी हात पुढे केला. त्यामधून दोन लाख एक हजार रुपयांची मदत गोळा झाली.
यासाठी डॉ.संतोष जठार, डॉ.अशोक देसाई, डॉ.लोणकर, डॉ.चंद्रकांत भोसले, डॉ.लक्ष्मीकांत पठारे, डॉ.दत्ता गायकवाड, डॉ.संदीप कोकाटे, कर्जतमधून डॉ.विलास राऊत, डॉ.रमेश मांडगे, नेवासामधून डॉ.सोमनाथ महाडिक, डॉ.धनंजय जपे, शेवगाव येथील डॉ.मल्हारी लवांडे यांनी प्रयत्न केले.