शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घरे खाली करा! श्रीरामपुरात रहिवाशांना रेल्वेच्या नोटिसा, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा रेलरोकोचा इशारा

By शिवाजी पवार | Updated: September 30, 2023 11:07 IST

Ahmednagar: श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

- शिवाजी पवार

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या दौंड मनमाड रेल्वे मार्गालगतच्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी अन्यथा रेलरोकोचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या उत्तर आणि दक्षिण बाजूस गेली पन्नास वर्षापासून राहत असलेल्या लोकांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हजारो लोक बेघर होऊन रस्त्यावर येतील अशी भीती आहे. शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक प्रबंधक एम. पी. पांडे यांना याप्रश्नी निवेदन दिले. रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या प्रशासनाला त्यात साकडे घालण्यात आले आहे.

शहरात पालिकेने येथील लोकांना घरकुले दिली आहेत. अनेकांचे येथे दुकान व्यवसाय सुरू आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटिसा देऊन घरे व दुकाने काढण्यास सांगितले आहे. या लोकांवर अन्याय झाल्यास लवकरच सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सर्वपक्षीय शिष्ट मंडळ भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भाजप शहराध्यक्ष मारुती बिंगले, शिवसेना उबाठाचे सचिन बडधे,भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, शिवसेना शिंदे गटाचे  युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, बीआरएसचे समन्वयक प्रवीण फरगडे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Railwayभारतीय रेल्वे