शिर्डी : साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध मॅरेथॉन आर्गनायझर चॅम्प एनड्यूरन्स संस्थेच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी शिर्डीत साई इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्रचारासाठी २३ डिसेंबरला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरपासून धावण्यास सुरुवात केलेले प्रसिद्ध धावपटू ब्रिज शर्मा अडीचशे किलोमीटर अंतर ४३ तासांत पार करीत सोमवारी सकाळी शिर्डीत पोहचले. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी ब्रिज शर्मा यांचे स्वागत केले. शर्मा यांनी सार्इंच्या मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेत ‘रन फॉर साई’ हा संदेश दिला. सध्या साई समाधी शताब्दी वर्ष जगभर साजरे करण्यात येत आहे़ या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यापैकीच शिर्डी इंटरनॅशनल मॅरेथॉन हा एक आहे.
ब्रिज शर्मा मुंबईहून ४३ तासांत शिर्डीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:12 IST