शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर अभियंता लोखंडेस अटक

By admin | Updated: June 28, 2017 18:34 IST

जलशुद्धीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे केलेल्या कामाचे थकीत बिल काढण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रकाश लोखंडे यांना २० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहाथ पकडले. या कारवाईने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.लोखंडे यांनी नगरपालिकेच्या जलशुद्धीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे केलेल्या कामाचे थकीत बिल काढण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच नवीन ठेकेदार येईपर्यंत कामाची मुदतवाढ दिल्याच्या बदल्यात वेगळ्या रक्कमेची मागणी केली होती. अनेक महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराचे बिल पालिका प्रशासनाने न दिल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने अखेर लोखंडे बेकायदा पैसे मागत असल्याची तक्रार नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. ठेकेदाराच्या तक्रारीवरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, डी.टी.धोंडे,पोलीस हवालदार शांताराम नाठे,अमोल निकुंभ,चालक परशुराम जाधव यांनी सापळा रचून मंगळवार २७ जूनला संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास कोपरगाव जवळील पुणतांबा चौफुली येथे ठेकेदाराकडून अभियंता लोखंडे यांना २० हजार रुपये घेऊन बॅगेत ठेवताच छापा टाकून रंगेहाथ पकडले. लोखंडे यांनी लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस निरीक्षक डी.टी.धोंडे करीत आहेत.

          जीवन प्राधिकरणाऐवजी जेलमध्येअभियंता प्रकाश लोखंडे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नुकतीच बदली झाली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला नवीन अभियंता येईपर्यंत लोखंडे यांना काम करण्याची विनंती पालिका प्रशासनाने केली होती. आता लोखंडे यांना जीवन प्राधिकरणात जाण्याऐवजी जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. लोखंडे यांनी ठेकेदाराकडून मागणी केलेल्या पैशाचे अजून किती भागीदार आहेत? याची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत.