श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथे कर्जदाराला तीन सावकारांनी मारहाण केल्याची घटना घडली असून, बेलवंडी पोलीस ठाण्यात तिघा सावकारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़घारगाव येथील सुनील नामदेव कळमकर यांनी एक वर्षापूर्वी सदाशिव कळमकर, भाऊसाहेब आरडे, गिताराम थिटे (रा़ घारगाव) या तिघांकडून तीन लाख रुपये दोन रुपये टक्क्यांनी व्याजाने घेतले होते़ तारण म्हणून सुनील कळमकर यांनी एक एकर जमिन खरेदीखत करुन दिली होती़ मात्र सुनील कळमकर याच्याकडून तिघांना वेळेत पैसे पोहोचले नाहीत, त्यामुळे तिघांनी मंगळवारी कळमकर याला मारहाण केली़ कळमकर याच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलिसांनी तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
घारगावात कर्जदाराला मारहाण; तीन सावकारांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 14:50 IST