शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणी पाणी योजनेत दोन गावे वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

ब्राह्मणी : ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावात बदल करण्यात आला असून यामध्ये आणखी दोन गावांचा ...

ब्राह्मणी : ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावात बदल करण्यात आला असून यामध्ये आणखी दोन गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता ही योजना सात गावांसाठी होणार आहे. या योजनेतून प्रतिदिन दरडोई ४० लिटरऐवजी ५५ लिटर पाणीपुरवठा केला जाईल. योजनेला तांत्रिक मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मोहन सराफ यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणी व इतर चार गावे प्रादेशिक पाणी योजनेस २४ जून २०१९ रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती; परंतु आचारसंहिता लागू झाल्याने कामाची निविदा प्रक्रिया राबविता आली नाही. योजनेची आखणी दरडोई ४० लिटरप्रमाणे करण्यात आली होती. दरम्यान, राज्यात नोव्हेंबर २०१९ अखेर जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जानेवारी २०२० च्या परिपत्रकानुसार ५५ लिटर दरडोई निकषाप्रमाणे पाणी पुरवठ्याचे निकष करून फेर मान्यता घेण्याविषयी सूचना प्राप्त झाल्या. योजनेत ब्राह्मणी, उंबरे, पिंप्री अवघड, सडे, कुक्कडवेढे या गावांचा समावेश होता. फेर प्रस्तावात या योजनेत चेडगाव व मोकळ ओहळ या दोन गावांचा समावेश करण्यात आला. हा सुधारित प्रकल्प अहवाल जीवन प्राधिकरणाच्या नगर कार्यालयातून मुख्य अभियंता, नाशिक यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी सादर केला आहे. नवीन योजनेसाठी ६० कोटी ५७ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही सराफ यांनी सांगितले.

............

ब्राह्मणी व इतर चार गावे योजनेच्या जुन्या आराखड्यात मुळा धरणातून दहा किलोमीटरची मुख्य जलवाहिनी एसडीपी प्रकारची होती. ती वारंवार फुटण्याचा धोका होता. नवीन योजनेत मुख्य जलवाहिनी लोखंडी (जीआय) केली जाणार आहे. ४० ऐवजी ५५ लिटर दरडोई पाणी मिळणार आहे. जुनी तकलादू योजना बदलून, नवीन योजनेत आणखी दोन गावांचा समावेश केला आहे.

- डॉ. राजेंद्र बानकर, माजी उपसरपंच, ब्राह्मणी