शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

फेरमतदानात दारूची बाटली आडवी

By admin | Updated: July 31, 2016 23:50 IST

पारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या नगरीत गावात दुसऱ्यांदा दारूबंदीसाठी फे रमतदान झाल्यानंतर सुमारे २ हजार २३६ मते पडून बाटली आडवी झाली.

पारनेर : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या नगरीत गावात दुसऱ्यांदा दारूबंदीसाठी फे रमतदान झाल्यानंतर सुमारे २ हजार २३६ मते पडून बाटली आडवी झाली. उभ्या बाटलीला अवघी १६८ मते मिळाली. यामुळे महिलांनी विजयोत्सव साजरा केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाचा हा विजय ठरला आहेनिघोज येथे दारूबंदीसाठी रविवारी फे रमतदान घेण्यात आले. मागील निवडणुकीत गोंधळ झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. म्हणून फेरनिवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार भारती सागरे यांनी मतदान केंद्रावर कुठलीही अडचण येऊ नये म्हणून नायब तहसीलदार दत्तात्रय भावले, संजय माळी, संजय दिवाण, गटविकास अधिकारी किशोर काळे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्यासह मंडलाधिकारी व अधिकारी यांचे पथक तयार करून सर्व पाच मतदान केंद्रांवर सुत्रबध्द पध्दतीने मतदानाचे नियोजन केले होते. मळगंगा विद्यालय, मुलिकादेवी विद्यालय, मोरवाडी जि.प.शाळा, वडगाव गुंड प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र होती. दारूबंदी चळवळीच्या महिला कांता लंके, सुरेखा लामखडे, छाया लामखडे, शुभांगी लामखडे, सनिषा घोगरे, पूजा रसाळ यांच्यासह महिलांनी प्रत्येक ठिकाणी महिला मतदारांना मतदानास येण्यासाठी व दारूची बाटली आडवी करण्यासाठी आवाहन केले. त्यानुसार महिला ठिकठिकाणी समुहाने बाहेर येत होत्या. दारूबंदीचे कार्यकर्ते बबन कवाद, अमृता रसाळ, प्रशांत वराळ,दत्ता भुकन, डॉ.महेंद्र झावरे, शिवबा संघटनेचे अनिल शेटे यांच्यासह सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके, मोहन कवाद, ज्ञानेश्वर कवाद यांच्यासह प्रत्येक ठिकाणी युवक व महिलांनी संघटितपणे मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)निघोजमध्ये महिलांनी दारूबंदी व्हावी यासाठी खूप संघर्ष केला होता. मतदानामध्ये दारूबंदी झाली हा विजय इतर गावांना दिशादर्शक ठरणार आहे. निघोजमधील महिला व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवकनिघोजच्या दारूबंदीचा निर्णय ऐतिहासिक असून त्यात सर्व महिला, युवक व ग्रामस्थांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याने आता तालुका दारूमुक्त करण्यासाठी बळ मिळणार आहे.-राहुल झावरे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षनिघोजमध्ये दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी आम्हाला मोठी साथ दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेली खंबीर साथ, त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची बैठक घेऊन मतपत्रिकेवर चिन्ह छापण्याचा तातडीने निर्णय घेण्यास भाग पडल्याने विजयी झेंडा फडकवला. सर्व महिला व युवक, सहकारी व प्रसारमाध्यमांचे आभार.-बबनराव कवाद, दारूबंदी चळवळीचे प्रमुख ,निघोज दुपारी दोनपर्यंत मतदान झाल्यानंतर निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात तहसीलदार भारती सागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. सुमारे तासाभरात मोजणी पूर्ण झाली. दोन हजार पाचशे वीस महिलांनी मतदान केले. आडव्या बाटलीला दोन हजार २३६ मतदान झाले.तर उभ्या बाटलीला १६८ मते पडली. ११६ मते अवैध ठरली. निकाल जाहीर झाल्यानंतर महिलांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.