शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या डंपरने दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 16:12 IST

अज्ञात वाळूच्या डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-हरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनाऊर-हरेगाव रोडवरील घटना : पिता-पुत्र गंभीर जखमी

नाऊर(अहमदनगर) : अज्ञात वाळूच्या डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जखमी झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर-हरेगाव रस्त्यावर सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.भागवत बबन त्रिभूवन (वय ३०) व शुभम भागवत त्रिभूवन (वय १०, दोघे रा. नाऊर, ता.श्रीरामपूर) हे नाऊर येथून हरेगावला जात असताना समोरून आलेल्या वाळूच्या डंपरने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात पिता-पूत्र गंभीर जखमी झाले. धडक देवून डंपर वेगाने पसार झाला. परिसरातील नागरिकांनी जखमींना रुग्णालयात आणले. यातील भागवत त्रिभूवन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र मोटारसायकलचा क्रमांकचा त्यात कुठेही उल्लेख नाही. फिर्यादी गणेश सोपान त्रिभूवन आणि जखमी यांचे नात्याबद्दलही ठाणे अंमलदार पवार यांना माहिती देता आली नाही. तपासी अधिकारी हे पुणे येथे गेले होते. त्यांना यासंदर्भात काहीही सांगता आले नाही.याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक खान यांच्याशी संपर्क केला असता वाळूच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैैठक झाली आहे. मात्र आमचे भरारी पथक परिवहन आयुक्तांनी मुंबई येथे बोलविले आहे. पथक आल्यानंतर दोन दिवसानंतर कारवाई करू, असे उत्तर त्यांनी दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर