शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीचे दोन्ही कालवे फुटले

By admin | Updated: July 13, 2016 00:28 IST

कोपरगाव : नांदूर मधमेश्वर धरणातून प्रचंड वेगाने पाणी सोडण्यात आल्याने मंगळवारी दुपारी गोदावरीचा डावा व उजवा हे दोन्ही कालवे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.

कोपरगाव : नांदूर मधमेश्वर धरणातून प्रचंड वेगाने पाणी सोडण्यात आल्याने मंगळवारी दुपारी गोदावरीचा डावा व उजवा हे दोन्ही कालवे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. जलसंपदा विभागाकडून युद्ध पातळीवर कालवे दुरूस्ती करण्यात येत आहे.नाशिक परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी नांदूर मधमेश्वर धरणात आल्यावर सोमवारी गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना सोडण्यात आले. सुमारे चौदा हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवाहीत झाल्याने कालवे तुडूंब भरून वाहत आहेत. दरम्यान, पाण्याचा दाब सहन न झाल्याने शंभर वर्ष पूर्ण झालेला डावा कालवा मुंगेर लागून मंगळवारी दुपारी ब्राम्हणगाव, तर उजवा कालवा विंगणवाडीनजीक अचानक फुटला. दोन्ही कालवे फुटल्याने लाखो लीटर पाणी परिसरातील शेतामध्ये घुसले. घटनेची माहिती मिळताच नाशिक जलसंपदा विभागाचे कायर्कारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी भेट दिली. संजीवनी उद्योग समूहाचे नितीन कोल्हे यांनी पोकलॅन व जेसीबी उपलब्ध करून दिले. उपअभियंता कासम गोतूवार व भास्कर शिरळे यांच्या अधिपत्याखाली कालवे दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू झाले आहे. संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी वक्ते घटनास्थळी भेट देवून मदत केली.कालवे फुटल्याने पाण्याचा अपव्यय होवू नये म्हणून दारणा धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. संबंधीत कालव्यांच्या दुरूस्ती साठी जलसंपदा मंत्री यांना भेटणार असल्याचे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी )गोदावरी कालव्यांवर लाभक्षेत्रातील अनेक गावांचे भवितव्य अवलंबून आहे. ब्रिटीशकालीन मातीच्या कालव्यांना शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. यापूर्वीही तीन वेळा कालवे फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. तिन्ही वेळा कोट्यवधी रुपये खर्च करून कालव्यांची दुरूस्ती केली गेली आहे. नुकतीच ५५ कोटी रूपयांच्या दुरूस्ती मंजुरी मिळाल्याचे समजते.४उजव्या कालव्याचे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तर डाव्या कालव्याची पाणी चालू ठेवून दुरूस्ती करण्यात येत असल्याचे शाखा अभियंता सुराळे यांनी सांगितले.