शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोस्वरूप विचार’ ग्रंथाने आत्मरूप विचार उलगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST

अहमदनगर : मन हे एकीकडे जड तत्त्व आहे. त्यामुळे ते प्रकृतीत मोडते. पण, दुसरीकडे ते इतके सूक्ष्म व तरल ...

अहमदनगर : मन हे एकीकडे जड तत्त्व आहे. त्यामुळे ते प्रकृतीत मोडते. पण, दुसरीकडे ते इतके सूक्ष्म व तरल आहे की त्याला एक मूलतत्त्वाचाच भाग मानण्याचा मोह व्हावा. मूलभूत चैतन्य तत्त्वाचे स्वरूप समजून मनाच्या माध्यमातून ते समजून घ्यायला हवे. मनोस्वरूप विचार ग्रंथात माउलींचा स्वसंवेद्य आत्मरूप विचार उलगडून पुढे नेला आहे, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ भाष्यकार, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

तीर्थक्षेत्र आळंदीत डॉ. अनिल सहस्रबुद्धे लिखित ‘मनोस्वरूप विचार’ आणि ‘संत प्रबोधित मनोस्वरूप विचार’ या ग्रंथांचे प्रकाशन सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे तथा देवस्थानचे प्रमुख अभय टिळक, मनशक्तीचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, संशोधन विभागप्रमुख शास्त्रज्ञ गजानन केळकर, बाळासाहेब आरफळकर, दिलीप महाजन, राजेंद्र नवले, दिगंबर नरवडे, संदीप लोहर, अविनाश धनवे, किशोर धुमाळ, मंगेश कदम, अजित मालूंजकर, सुरेश कातोरे, अभिषेक हांडे, युवराज सुकळी, भीमसेन शिंदे आदी उपस्थित होते. मोरे पुुढे म्हणाले, मन आणि मनाच्या स्वसंवेद्यतेचा संबंध मानवी जीवनाशी कसा लावायचा, या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळते. हे ग्रंथ म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांच्या उपदेशाचा गाभाच आहेत.

प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांनी ग्रंथातील सूत्रे उलगडून दाखवित ग्रंथाची उपयुक्तता विशद केली. ते म्हणाले, सहस्रबुद्धे यांनी उपयुक्तवाद अतिशय ताकदीने समजावून सांगितला. मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे म्हणाले, आज जगभरातच जाणिवेबद्दल संशोधन चालू आहे. या संशोधनाची व्याप्ती आता फक्त तत्त्वज्ञान या विषयापुरती सीमित न राहता ती मेंदूशास्त्र, मानसशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, संगणकशास्त्र अशा अनेक शास्त्रांशी जोडली गेली आहे. त्यामुळे मानवी मन म्हणजे काय हे समजून घेण्याची आवश्यकता संशोधकांना भासू लागली आहे.

कार्यक्रमात सुरेखा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उषा सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. उमेश बागडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मच्छिंद्र मालूंजकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमापूर्वी डॉ. सहस्रबुद्धे यांनी दोन्ही ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीसमोर अर्पण केली.

--

फोटो- २८ पुस्तक प्रकाशन

‘तीर्थक्षेत्र आळंदीत मनोस्वरूप विचार’ आणि ‘संत प्रबोधित मनोस्वरूप विचार’ या ग्रंथांचे प्रकाशन करताना डॉ. सदानंद मोरे व मान्यवर.