शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा : कोपरगाव रेल्वेस्थानकावर तीन तास कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:23 IST

पुण्याहून मनमाडच्या दिशेने निघालेली पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला बुधवारी दुपारी आला

कोपरगाव : पुण्याहून मनमाडच्या दिशेने निघालेली पुणे-हटिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला बुधवारी दुपारी आला आणि पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली. त्यांनी तत्काळ नगर पोलिसांशी संपर्क करून कोपरगाव रेल्वेस्थानकातच एक्स्प्रेसची तब्बल तीन तास कसून तपासणी केली.पुण्यावरून निघालेली पुणे-हटिया सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक २२८४५/४६ ) ही कोपरगाव रेल्वे स्थानकावर दुपारी ३.३० वाजता थांबविण्यात आली. या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला होता़ त्यावेळी रेल्वे कोपरगावमधून चालली होती. तेथेच रेल्वे थांबवून पोलिसांनी तपासणीसाठी स्थानिक पोलिसांची मदत मागितली़ त्यानुसार शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह बॉम्ब शोधक पथक त्वरित कोपरगाव रेल्वे स्थानकावर गेले.सुपर फास्ट एक्सप्रेसची बॉम्ब शोधक, श्वान पथकाने कसून तपासणी केली. मात्र या सुपर फास्टमध्ये कोणताही बॉम्ब, अन्य काही स्फोटके सापडले नसल्याने रेल्वे प्रशासनासह रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ही सुपरफास्ट एक्सप्रेस सायंकाळी ७ वाजता हटियाच्या दिशेने रवाना करण्यात आली. या बॉम्ब शोधक पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप कोष्टी, पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. व्ही. भिंगारदिवे, पोलीस नाईक डी. के. पूर्णाळे, पोलीस नाईक पी. एन. डोळसे, चालक शेख मोहम्मद आदी सहभागी होते. या बातमीमुळे कोपरगाव रेल्वेस्थानकाचे संपूर्ण प्रशासन हादरून गेले होते.सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपअधीक्षक-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या मागील दोन डब्यात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी पुणे रेल्वे नियंत्रण कक्षाला आला होता़ त्यानुसार त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांची मदत मागितली़ त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, अन्य सहा अधिकारी व जवळपास शहर व तालुक्यातील ३५ कर्मचाऱ्यांसह बॉम्ब शोधक, नाशक पथक, श्वान पथक घेऊन तातडीने कोपरगाव रेल्वे स्थानकात दाखल झालो. प्रथम मागील बारा डब्यातील सर्व प्रवासी उतरवून आतील व खालील बाजूने तपासणी करण्यात आली़ त्यानंतर उर्वरित दहा डबेही तपासण्यात आले़ मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव