शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

बल्हेगाव ते लंडन वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:40 IST

मूळचे येवला तालुक्यातील बल्हेगाव येथील प्रा.रवींद्र शंकरराव पिंगळे व चंद्रभागा शंकरराव पिंगळे यांचे सुपुत्र रवींद्र

मूळचे येवला तालुक्यातील बल्हेगाव येथील प्रा.रवींद्र शंकरराव पिंगळे व चंद्रभागा शंकरराव पिंगळे यांचे सुपुत्र रवींद्र. आई-वडिलांकडून बालपणाची शिदोरी घेऊन वयाच्या १२ वर्षी १९८२ साली आपल्या बालपणात संगीत व गायनाचा व्यासंग जपला. कोपरगाव येथील प्रसिद्ध आनंद संगीत विद्यालयाचे संचालक आनंदराव आढाव उर्फ अण्णा हे स्वत: अंध असताना देखील त्यांच्या सानिध्यात रवींद्र आले. आज रवींद्र यांचा संगीत, गायनाच्या माध्यमातून जगभर प्रसार झाला आहे.शिर्डी येथील साई ब्रह्मनाद स्वरमंचाचे संस्थापक प्रा.रवींद्र पिंगळे यांना वर्ल्ड शिर्डी साईबाबा आॅर्गनायझेशन यु.के.या संस्थेच्या इस्ट हम व फोरेस्ट गेट लंडन येथील साईबाबा सेवा केंद्रांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी निवड झाली. आपल्या सेवेसाठी रुजू होण्यासाठी लंडन येथे रवाना झाले. तेथे त्यांना साईबाबांची दैनंदिन पूजा, आरती, अभिषेक, ध्यान आणि भजन, वर्षभरातील साईबाबांचे शिर्डी प्रमाणे विविध उत्सव व इतर हिंदू सण अशा सर्व कार्यक्रमांची जबाबदारी संस्थेने दिली. अनेक वर्षांपासून साईबाबा मंदिरात भजन सेवा देत असून देश विदेशात साईबाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. साई ब्रह्मनाद स्वरमंचाच्या माध्यमातून मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, पोलंड आदी देशात नियमित साईभजन सेवा नियमितपणे देत आहेत. १९८५ मध्ये १० वीला असताना प्रथम साईबाबांच्या मंदिरात आनंद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून भजन सेवा सादर केली. तेव्हापासून आतापर्यंत नियमितपणे भजनसेवा देत असून विविध देशातील अनेक साई भक्तांना शिर्डीत येण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. अनेक देशातील साई भक्तांबरोबर त्यांनी साईबाबा मंदिरात भजनसेवा सादर केलेली असून नुकत्याच संपन्न झालेल्या श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षातही साई बाबांचे चरणी भजनसेवा सादर करण्याची संधी त्यांना मिळाली.आजपर्यंतच्या त्यांच्या वाटचालीत कोपरगाव येथील आनंद संगीत विद्यालयाचे संस्थापक संचालक गुरुवर्य आनंदराव आढाव(अण्णा), जंगलीदास माउली, देवानंद महाराज, डॉ.राम बोरगावकर, अनिल डोळे, डॉ.डी.एस.मुळे, सुनीता मुळे, सूत्रसंचालिका राजश्री, रविजा व ऋतुजा, साई ब्रह्मनाद स्वरमंचाचे कलाकार संकेत दरकदार, नकुल भगत, पंकज पाखले, पराग पाखले, नीलिमा खानापुरे, सुचिता कुलकर्णी, जगन्नाथ रोहोम, संतोष शेलार, अमित पंडित, साहेबराव काळे, वाल्मीकराव महाले, वाल्मीकराव तुरकणे, ज्ञानेश्वर तुरकणे, वडील शंकर पिंगळे गुरुजी यांच्यासह सर्व क्षेत्रातील लोकांची साथ लाभली.रोहित टेके

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर