शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या ...

श्रीरामपूर : गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला. हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांचा यापूर्वीच घातपात केला असण्याची दाट शक्यता आहे.

राज्याच्या अधिवेशनात हिरण यांच्या अपहरणाचा मुद्दा चर्चिला गेला होता. मात्र, पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अपयश आले. शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी बेलापूर येथे येऊन अपहरण प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यांच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, उपयोग झाला नाही. पोलिसांना हिरण यांच्या अपहरणामागील हेतू शेवटपर्यंत समजला नाही. त्यामुळे तपासाची निश्चित अशी दिशा घेता आली नाही. प्रारंभी काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका व्हॅनचा तपास केला. मात्र, त्यात तथ्य आढळून आले नाही. या दरम्यान पोलिसांचा वेळही वाया गेला होता.

व्यापारी हिरण यांच्या अपहरणानंतर बेलापूर येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. घटनेची गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात याप्रकरणी गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला होता. श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देत हिरण यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली होती.