शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डोणगाव येथे विहीरीत आढळला विद्यार्थीनीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:33 IST

हळगाव : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीच्या विद्यार्थीनीचा मुतदेह एका विहीरीत आढळुन आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.मुक्ता संभाजी वारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा यादृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत. या प्रकरणात एका संशयिताला चौकशीसाठी जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हळगाव : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीच्या विद्यार्थीनीचा मुतदेह एका विहीरीत आढळुन आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.मुक्ता संभाजी वारे असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. सदर घटना ऑनर किलींगचा प्रकार आहे की खुनाचा यादृष्टीने जामखेड पोलिस अधिक वेगाने तपास करत आहेत. या प्रकरणात एका संशयिताला चौकशीसाठी जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील मुक्ता संभाजी वारे ही विद्यार्थीनी गुरूवारी दुपारी बेपत्ता झाली होती. शुक्रवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार मयत मुलीचे आजोबा शहाजी कोंडिबा यादव यांनी पोलिसात दाखल केली होती. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता तरूणीचा मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकर्याच्या शेतातील विहीरीत आढळून आला.जामखेड पोलिस स्टेशनला मुलीचे वडील संभाजी वारे यांनी खबर दिली होती.मयत मुक्ता वारे ही विद्यार्थीनी लहाणपणापासुन डोणगाव या आपल्या आजोळी राहण्यास होती. तीने यावर्षी बारावीची परिक्षा दिली होती. तीचे मुळगाव जामखेड तालुक्यातील रत्नापुर आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, हेड काँस्टेबल शिवाजी भोस , काँस्टेबल विष्णू चव्हाण, बाजीराव सानप, अजय साठे, शशिकांत म्हस्के, पोलिस मित्र अमोल यादव, शुभम यादव, पोलिस पाटील बिभीषण यादव यांनी भेट देत विहीरीतून मृत विद्यार्थीनीचा मृतदेह बाजेच्या सहाय्याने बाहेर काढला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.सदर विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अधिक वेगाने जामखेड पोलिस करत आहेत.या प्रकरणात डोणगाव - अरणगाव परिसरातून एका संशयित तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. 

 

फोटो -  घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण