शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोमवतीनिमित्त पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:14 IST

सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवात आज राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाचे देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार भाविकांनी केला. पहाटे श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीला गंगास्नान घातल्यानंतर श्री खंडोबाचा अभिषेक पूजा, महाआरती करण्यात आली.

कान्हूर पठार : सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवात आज राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाचे देवदर्शन घेऊन कुलधर्म व कुलाचार भाविकांनी केला. पहाटे श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीला गंगास्नान घातल्यानंतर श्री खंडोबाचा अभिषेक पूजा, महाआरती करण्यात आली. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.सोमवारी सकाळी १० वाजता पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिरातून टाक्याचा दरा येथे गंगास्नानसाठी पालखी सोहळा, छबिनामिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, सचिव महेंद्र नरड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, चंद्रभान ठुबे, मनीषा जगदाळे, किसन धुमाळ, अमर गुंजाळ, सुरेश सुपेकर, किसन मुंढे या विश्वस्तांसह बन्सी ढोमे, रामदास मुळे, उपसरपंच बाळासाहेब पुंडे, सुरेश ढोमे, शांताराम खोसे, जालिंदर खोसे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात व लेझीमच्या डावात सदा आनंदाचा येळकोट, जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. लंगर तोडल्यावर भाविकांनी पालखीवर भंडारा, खोब-याची उधळण केली. यावेळी पालखी छबिनापुढे भाविकांनी ओलांडा घेतला. पालखी खालून प्रदक्षिणा घातली. यानंतर सामूहिक तळीभांडार झाला. सकाळी ११ वाजेपासून भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद शिरूर तालुक्यातील औरंगापूर येथील भाऊसाहेब डुकरे, रामदास डुकरे, भिमाजी डुकरे, श्रीपत घुले, बबन डुकरे, चिमाजी डुकरे, सोपान थिटे, दत्तू थिटे, भास्कर डोंगरे (अणे) यांच्यातर्फे देण्यात आला. दर्शन व्यवस्था क्रांती शुगर कारखानच्या सुरक्षा पथकाने यशस्वी पार पाडली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर