शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साईबनच्या जलाशयात बोट उलटली; आठजण थोडक्यात बचावले, बोटचालकासह संचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:45 IST

साईबन कृषी पर्यटन केंद्रातील जलाशयात बोट उलटण्याची घटना घडली़ यातून आठ पर्यटकांना चार तरुणांनी मोठ्या शिताफिने वाचविले. या प्रकरणी सोमवारी संदीप बाळकृष्ण सप्रे (रा. स्टेशन रोड, नगर) यांनी बोटचालकासह साईबन केंद्राच्या संचालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर : साईबन कृषी पर्यटन केंद्रातील जलाशयात बोट उलटण्याची घटना घडली़ यातून आठ पर्यटकांना चार तरुणांनी मोठ्या शिताफिने वाचविले. या प्रकरणी सोमवारी संदीप बाळकृष्ण सप्रे (रा. स्टेशन रोड, नगर) यांनी बोटचालकासह साईबन केंद्राच्या संचालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.साईबन येथे संदिप सप्रे यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले तसेच त्यांचे इतर चार नातेवाईक असे आठ जण रविवारी पिकनिकसाठी गेले होते. सायंकाळी चार वाजता केंद्रातील जलाशयात ते बोटिंगसाठी गेले. यावेळी ६ सीटर बोटमध्ये चालक धरून नऊ जणांना बसविण्यात आले. या बोटीचे दोन पैकी एक पॅडल निकामी होते. बोटीमधून जलाशयाला एक चक्कर मारल्यानंतर किना-याकडे येत असता बोटीत मागच्या बाजुने पाणी शिरत होते़ याबाबत बोटचालकाला सप्रे यांनी कल्पना दिली होती. त्याने मात्र दुर्लक्ष केले. त्यानंतर काही क्षणातच बोट उलटली. यावेळी सर्व आठ जण पाण्यात पडले. बोटलचालकाने बुडणा-यांना काहीच मदत न करत तो पोहोत पाण्याबाहेर गेला. सप्रे यांना पोहोता येत असल्याने त्यांनी त्यांची पत्नी व एका मुलाला बाहेर काढले. यावेळी जलाशयाशेजारी उपस्थित असलेल्या देवेंद्र बेरड, संतोष लोंढे, विलास माने व मनोज गाडळकर यांनी पाण्यात उडी घेऊन उर्वरित लोकांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला. साईबनच्या जलाशयात सुरक्षा जॅकेट, सुरक्षा रक्षक, लाईफ गार्ड, सुरक्षा ट्यूब, रोरी असे कोणतेही साहित्याची व्यवस्था केलेली नाही. तसेच बोटचालकास प्रशिक्षण दिलेले नसल्याचे दिसले, असे संदिप सप्रे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पोलीसांनी कलम २८०, ३३६ व ४२७ प्रमाणे बोटचालकासह साईबनच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस