अहमदनगर : शहरातील नवीपेठेतील श्री जय आनंद महावीर युवक मंडळाच्यावतीने गेल्या पन्नास वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो़ गणेशोत्सवासह वर्षभर विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन हे या मंडळाचे वैशिष्ट्ये आहे़ अशोकभाऊ फिरोदिया, शांतीलाल फिरोदिया, कन्हैयालाल चंगेडिया यांनी सामाजिक कार्याचा घालून दिलेला वारसा आजही पुढे चालवित असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी सांगितले़ मंडळाच्यावतीने प़ पू़ आनंदऋषी पुण्यतिथीनिमित्त अन्नदान, महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, अनाथांना कपडे व अन्नधान्यांचे वाटप यासह सर्वरोग निदान, रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते़ या मंडळात महिलांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांच्यावतीनेही महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ धार्मिक उत्सवातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य गेल्या पन्नास वर्षांपासून केले जात असल्याचे मुनोत यांनी सांगितले.प्रबोधनात्मक देखावे लक्ष्मी कारंजा येथील संकल्प युवक मंडळाच्यावतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा जोपासली जात आहे़ गणेशोत्सवासह मंडळाच्यावतीने वर्षभर महिलांसाठी कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, शालेय साहित्याचे वाटप व गरजुंना मदत दिली जाते़ गणेशोत्सवात मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रबोधनात्मक देखावा तयार केला जातो़ मंडळाने या वर्षी सावित्रीची वटपूजा हा हलता देखावा साकारला आहे़ डिजे न वाजविता पारंपरिक वाद्य वाजवूनच दरवर्षी श्रींची प्रतिष्ठापना केली जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले़ धार्मिक कार्यक्रमगणेशोत्सवानिमित्त शहरातील माळीवाडा पंचमंडळाच्यावतीने दरवर्षी धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते़ भाविकांसाठी त्रासदायक ठरेल, अशा पद्धतींना फाटा देवून प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो़ यावर्षी दहा दिवस कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे़ पहिल्या दिवशी धीरज ससाणे यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम झाला़ गणेशयाग, अग्निहोत्र, उत्थापना आदी धार्मिक उत्सवांची परंपरा या मंडळाच्यावतीने जोपासली जात आहे़ शहरातील मानाच्या गणपतींपैकी असलेल्या कपिलेश्वर मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात गेली अनेक वर्षे धार्मिकतेसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते़ दरवर्षी ऐतिहासिक किंवा पौराणिक देखावे सादर केले जातात़ यावर्षी मंडळाच्यावतीने ‘गणेश जन्म’ हा हलता देखावा सादर करण्यात आला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष कैलास गिरवले यांनी सांगितले़ नारळावर श्रीफळेश्वर यात्राअहमदनगर : तीन किलो वजनाच्या मोठ्या तिनाक्षी नारळावर येथील कलाकार अमोल बागूल यांनी १०८ मूर्त्यांसह श्रीफळेश्वर यात्रा मिरवणुकीचा हलता देवाखा घरगुती गणेशोत्सवात सादर केला आहे़ एक फूट लांबीच्या तीन अक्ष, तीन बाजू असलेल्या नारळावरील साकारलेल्या विविध आकर्षक मूर्ती लक्षवेधी आहेत़ या श्रीफळेश्वर यात्रेतील लहान मण्यांमध्ये कोरलेली गणेश मूर्ती, दगडी गणेश मूर्ती, मिरवणुकीत नाचणारे नर्तक, भगवा झेंडा घेतलेले भाविक, वाद, सुपारीवरील महाराष्ट्रातील अष्टविनायक, खडू शिल्पातील नगर शहरातील अष्टविनायक, छोटा भीम, डोरेमॉन, चुटीकी, मि़ बीन, कितरेसू आदी मूर्त्या तयार करून त्यांची आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली आहे़ शहाळ्याभोवती फिरणारी दिल्लीगेट स्पेशल फुलराणी रेल्वे, संगीतावर चालणारे रहाटगाडगे, चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, फुलणारे कमळ, कागदी घोडे, कोंबड्यांच्या झुंजीचे खेऴ असा आकर्षक देखावा बागूल यांनी सादर केला आहे़ कागद, पुठ्ठा, लाकूड, माती, नारळ, कापड, आदी निसर्गात सहज विघटन होणाऱ्या पर्यावरणपूरक माध्यमातून बागूल यांनी हा देखावा साकारताना टाकाऊ पासून टिकाऊ या पर्यावरण सुत्राचा वापर केला आहे़
सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ
By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST