शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी न दिल्याने श्रीरामपूरमध्ये तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 19:13 IST

श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात मालमत्ता खरेदी व्यवहाराच्या कारणावरुन १० लाखाची खंडणी न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणावर तलवारीने वार करुन खून केला तर दुसरा तरुण मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, आरीफ इब्राहीम मिर्झा (रा. हुसेनगर वार्ड नं.१) याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.२) मार्च रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास आरोपी वसीम मेहबूब खान, अब्दुल अश्पाक शेख, जुबेर अश्पाक शेख, फिरोज गफार खान, आयाज अश्पाक शेख, मुजमील बागवान, फरजान फारुख शेख, मौलाना अहमद फारुख शेख(सर्व रा.हुसेननगर, वार्ड नं.१), विशाल हरिषचंद्र लाहुंडे, निलेश शिंदे (रा.सरस्वती कॉलनी, वार्ड नं.७) हे सर्व आरोपी व त्यांची इतर साथीदार सायंकाळी ५ च्या सुमारास फिर्यादी आरीफ मिर्झा याच्या घरी आले व त्यास म्हणाले, तू आम्हाला न विचारता जागा का खरेदी केली? असा जाब विचारला. तू जागा खरेदी केली आता आम्हाला १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी केली. खंडणीचे १० लाख रुपये दिले नाही या कारणावरुन वरील आरोपी, त्यांच्या सहकाºयांनी जीवे मारण्याची धमकी देत माझा भाऊ समीर इब्राहीम मिर्झा याच्या डोक्यावर तलवारीने वार करीत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीची आई व पत्नी यांना शिवीगाळ करुन घरात घूसून मारहाण करुन घरातील वस्तूंचे व कारचे नुकसान केले.फिर्यादीचा भाऊ साजीद इब्राहीम मिर्झा यावरही डोक्यावर तलवारीने मारहाण केली. घटनेनंतर दोन्ही जखमींना साखर कामगार हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र जगधने यांनी समीरची प्रकृती चिंताजनक आहे. तर साजीद मिर्झा याचे उपचारापूर्वी निधन झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी तिघा जणांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर