शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साईसंस्थान रुग्णालयाला रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 20:53 IST

शिडी : लॉकडाऊनच्या काळात साईबाबा संस्थानला आॅनलाईनद्वारे पैशाचे डोनेशन सुरू असले तरी भाविकांकडून होणारे ब्लड डोनेशन बंद झाले आहे़  या पार्श्वभुमीवर साईसंस्थान रूग्णालयाला सध्या रक्ताची वाणवा आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कशिडी : लॉकडाऊनच्या काळात साईबाबा संस्थानला आॅनलाईनद्वारे पैशाचे डोनेशन सुरू असले तरी भाविकांकडून होणारे ब्लड डोनेशन बंद झाले आहे़  या पार्श्वभुमीवर साईसंस्थान रूग्णालयाला सध्या रक्ताची वाणवा आहे़साईबाबा मंदीर परिसरात साईबाबा रक्त पेढीसह जवळपास नऊ रक्त पेढ्या रक्त संकलन करत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल १७ हजार ९९२ भाविकांनी रक्त दान केले़  याशिवाय संस्थानच्या रक्त पेढीत जावूनही ११ हजार १७२ नागरिकांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले़साईबाबा संस्थान रक्त पेढीत जवळपास चारशे बाटल्यांचा साठा असतो़  आता हा साठा तीस-चाळीसवर आला आहे़  सध्या लॉकडाऊनमुळे रूग्णालय काही अंशीच सुरू असले तरी डिलेव्हरी, अ‍ॅनिमिया व तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी रक्तांची आवश्यकता असते़  मंदीर बंद होण्यापूर्वी जमा झालेले रक्त संस्थानची दोन्ही रूग्णालये व बाहेरील काही रूग्णांसाठी खर्ची पडले़  साठवलेल्या रक्ताचे आयुर्मान केवळ पस्तीस दिवसांचे असते़  संस्थान रक्तपेढीत रक्ताचे घटक सुद्धा बनवले जातात़  सध्या मात्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़  एकाच वेळी रक्तदान शिबीर घेवून जमा झालेले रक्त कितपत वापरले जाईल, याबाबत रक्तपेढीच्या व्यवस्थापनाला शंका आहे़  त्यामुळे लॉकडाऊन संपत नाही, तोपर्यंत आवश्यकतेनुसार रक्त जमा करण्याची त्यांची भुमिका आहे़  यामुळेच संस्थानने इच्छुक रक्तदात्यांना नोंदणी करून ठेवण्यास सांगितले आहे़  तसेच रक्तपेढीकडे सुद्धा काही दात्यांची यादी आहे़  सध्या त्यानुसार या दात्यांशी संपर्क साधला जात आहे़  मात्र लॉकडाऊनमुळे मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे़  यामुळे शिर्डीतील अनेक तरुणांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे़