अहमदनगर : महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक लक्ष्मीकांत झंवर, ओमप्रकाश चांडक, मोहनलाल मानधना, मुरलीधर बिहाणी, विनोद मालपाणी, जनमाबाई काबरा, गीता गिल्डा, मथुरा झंवर, डॉ. आर. बी. धूत, अशोक बंग, राजेंद्र मालू, सुयोग झंवर, युवक संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मोहनलाल मानधना म्हणाले, समाजाला एकत्र ठेवण्याचे काम युवक संघटनेच्या माध्यमातून होत आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडून विविध उपक्रमांद्वारे समाज संघटनेचे कार्य केले आहे. युवक संघटनेने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे.
प्रास्ताविकात विशाल झंवर म्हणाले, कोरोना परिस्थितीतही माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नेत्र तपासणी शिबीर, अँटीबॉडिज् तपासणी, मुलांसाठी चित्रकला, बुद्धिबळ, हस्तकला ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यास समाजातून चांगला प्रतिसाद लाभला. संघटनेने वर्षभरातील या उपक्रमांद्वारे समाजाचे संघटन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात ८१ रक्तपिशव्यांचे रक्त संकलन झाले. यावेळी कोरोना काळात विविध संस्थांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री झंवर यांनी केले तर आभार सचिव शेखर आसावा यांनी मानले. संघटनेचे श्याम भुतडा, गणेश लढ्ढा, शेखर आसावा, अनिकेत बलदवा, अमित काबरा, अमित जाखोटिया, संकेत मानधना, उमेश झंवर, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, सुमित चांडक, प्रतीक सारडा, कुणाल लोया, योगेश सोमाणी, पीयुष झंवर, संकेत अट्टल, तेजल गिल्डा आदींनी परिश्रम घेतले.
---------
फोटो- २० महेश नवमी
महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक मंडळातर्फे रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक कार्यकर्ते.
फोटो - महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी रामकृष्ण अर्बन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मीकांत झंवर. समवेत ओमप्रकाश चांडक, मोहनलाल मानधना, मुरलीधर बिहाणी, विनोद मालपाणी, जनमाबाई काबरा, गीता गिल्डा, मथुराबाई झंवर, डॉ.आर.बी.धूत, अॅड.अशोक बंग, राजेंद्र मालू, सुयोग झंवर, युवक संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर आदी.