पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील महारुद्र प्रतिष्ठानमधील युवकांनी गणेशोत्सवानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
शिबिराचे उद्घाटन आदर्श गाव मांजरसुंबाचे जालिंदर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड, डॉ. सुरेश बोरा, संजय प्रभुणे, महारुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बोरा, पत्रकार खासेराव साबळे आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानने यापूर्वी कोविड काळात त्यांनी विविध औषधी, सॅनिटायझर वाटप, रक्तदान शिबिर व संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी, असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिबिर यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान अध्यक्ष शुभम बोरा, उपाध्यक्ष अनिकेत ठाणगे, सचिव प्रकाश गायकवाड, खजिनदार सत्यम बोरा, मनोज गुंड, ओंकार झिने, आकाश साठे, निखिल ठाणगे, धर्मराज गायकवाड आदींनी प्रयत्न केले.
180921\img_2763.heic
पिंपळगाव माळवी येथील महारुद्र प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते