राहुरी : राहुरी तालुका फोटोग्राफर्स सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला फोटोग्राफर्सनी चांगला प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिरात जवळपास ५१ दात्यांनी रक्तदान केले.
राहुरी तालुका फोटोग्राफर्स सामाजिक संस्था व जनकल्याण समिती, उत्तर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथील रघुनंदन लॉन्स येथे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन रघुनाथ शेलार, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. सुचेता कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. विलास मढीकर, डॉ. गुप्ता, जनकल्याण समितीचे रवींद्र कोळपकर, डॉ. जितेंद्र शेळके, अजित पारख, संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे, वैभव धुमाळ, ईश्वर लहारे, गणेश नेहे, सतीश कोबरने, शरद पुजारी, जालिंदर मुसमाडे आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी हरिश शेलार, भास्कर तनपुरे, भरत दिघे, बाबासाहेब कळमकर, वसंत पवार, सतीश हरकळे, राजेंद्र साळवे, प्रभाकर जाधव, संजय पाचरणे, सचिन गाढे आदींनी परिश्रम घेतले.