शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंनी घेतले आई -वडिलांचे आशीर्वाद

By admin | Updated: July 11, 2016 23:49 IST

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी अचानक चौंडी (ता. कर्जत) या आपल्या गावी येऊन आई-वडिलांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

कर्जत : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही आलेले जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी अचानक चौंडी (ता. कर्जत) या आपल्या गावी येऊन आई-वडिलांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.चौंडी येथे आपल्या घरी जाऊन त्यांनी आई- वडिलांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी कर्जतमध्ये विकास कामांची आढावा बैठक घेतली. कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर येथे आल्यानंतर त्यांनी प्रथम कर्जतकरांना अभिवादन केले. पदयात्रेने जाऊन गोदड महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा कर्जत शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलांगे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, भाजयुमोचे शहराध्यक्ष सागर साळुंके, अतुल कानडे आदी हजर होते.कर्जत विश्रामगृहातील बैठकीत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेतला. कर्जत तालुक्यात कोणकोणत्या ठिकाणी बंधारे करता येतील, याचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, तहसीलदार किरण सावंत, पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदी हजर होते. कर्जत येथील न्यायालयाच्या इमारतीला निधी मंजूर करून काम सुरू केले, तसेच कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल कर्जत तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष नवनाथ फौंडे, अ‍ॅड. उत्तम नेवसे, अ‍ॅड. दीपक भंडारी यांनी शिंदे यांचा सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)