शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दिवाळीपर्यंत झगमगाट

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

अहमदनगर : सणासुदीच्या दिवसांनाच जोडून आलेला विधानसभा निवडणुकांचा कालावधी यामुळे भारनियमनातून काही दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

अहमदनगर : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनाच जोडून आलेला विधानसभा निवडणुकांचा कालावधी यामुळे भारनियमनातून काही दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वीज भारनियमनाबाबत ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातील ग्राहकांची मोठी नाराजी असते. थकबाकी व नेहमीच्या वीजचोरीमुळे गटनिहाय भारनियमन महावितरणने लागू केले होते. त्यामुळे तीन ते तब्बल आठ तासांपर्यंत वीजकपातीचा सामना ग्राहकांना करावा लागला. त्यातच पाण्याअभावी राज्यातील मोठे वीजनिर्मिती केंद्र बंद पडल्याने झालेली तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या भारनियमनाचीही भर पडली. याव्यतिरिक्त स्थानिक उपकेंद्र, रोहित्रांतील बिघाड वेगळाच. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेरपर्यंत भारनियमनाचा चांगलाच चटका ग्राहकांना बसला. परंतु जुलैमध्ये पंढरपूर यात्रा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महावितरणने २० ते २५ दिवस भारनियमन रद्द केले. त्यानंतर मात्र पाऊस नसल्याने आणखी वीज तूट निर्माण झाली व १०-१५ दिवस विजेचा लपंडाव सुरू झाला. नंतर मात्र आॅगस्टमध्ये आलेला गणेशोत्सव, दरम्यान पावसाची दमदार हजेरी यामुळे अखंडित वीज मिळू लागली. त्यातच सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. आता नवरात्रौत्सवात दहा दिवस भारनियमन रद्दचे आदेश महावितरणने काढले आहेत. आॅक्टोबरमध्ये दसरा व दिवाळी असे सणासुदीचे दिवस असल्याने भारनियमन रद्द होणारच आहे. त्यामुळे ए पासून एफपर्यंतच्या गटातील ग्राहकांनाही अजून महिनाभर तरी २४ तास वीजपुरवठा होईल, अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)