शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

By admin | Updated: April 9, 2017 17:08 IST

जखमी मादी काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ठपका उपवनसंरक्षक समितीने पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व गार्ड यांच्यावर ठेवला आहे.

आॅनलाईन लोकमतपारनेर (अहमदनगर), दि़ ९- जखमी मादी काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ठपका उपवनसंरक्षक समितीने पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व गार्ड यांच्यावर ठेवला आहे. यामुळे जिल्ह्यातील वन विभाग वर्तुळात खळबळ उडाली आहे.पारनेर तालुक्यातील पारनेर-राळेगणसिद्धी मार्गावर राळेगणसिद्धीनजीक दोन्ही पायांला जखम झाल्याने दोन एप्रिल रोजी काळविटाची मादी रस्त्यावरच पडली होती़ त्याच्यावर वन विभागात उपचार सुरू होते़ पशुवैद्यकीय अधिकारी गुंड यांनी त्याच्यावर उपचारही सुरू केले होते़वन विभागाने उपचार करताना काळविटाला बाथरूममध्ये कोंडले होते. बाथरूममध्ये कोंडल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़दरम्यान, मृत्यू होऊनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळविटाकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरात दुर्गंधी पसरल्याने वन विभागाच्या मागील बाजूस राहणाऱ्या रहिवाशांनी याबाबत काही ग्रामस्थांना माहिती दिली़ ग्रामस्थांनी फिरून पाहिल्यावर वन विभागाच्या ज्या खोलीत काळवीट होते; तेथूनच दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. काही युवक तेथे गेल्यावर वन विभागाच्या त्या कोंडवाड्याच्या खोलीत काळविटाची मादी मरण पावल्याचे दिसून आले. बाथरूममध्येच डांबल्याने काळविटाचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे मोठी दुर्गंधी सुटली होती. याची माहिती पारनेरमधील युवक व पत्रकारांनी जिल्हा वनसंरक्षक श्री लक्ष्मी यांना दूरध्वनीवर दिल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेत तातडीने सहायक वनसंरक्षक संजय कडू यांना पाठवले. कडू यांनीही या प्रकाराची चौकशी करून काळविटाच्या मादीचा मृत्यू व त्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे व रक्षक शिंदे यांच्यावर ठेवला आहे़ त्यांनी दोघांनीही काळविटाची जखमी मादी वन विभागात आणली असून, उपचार चालू असल्याचे वरिष्ठांना सांगणे आवश्यक होते. तसेच मुख्यालयी राहात नसल्याने त्या मादीचा संशयास्पद मृत्यू होऊनही नंतरच्या कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे़