शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हनुमंत गाडेंवर बेकायदेशीर काम केल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:18 IST

बेकायदेशीर निधी जमवून पारनेर व निघोज पोलीस ठाण्याचे सुशोभिकरण केल्याच्या प्रकरणात पारनेरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

जवळे : बेकायदेशीर निधी जमवून पारनेर व निघोज पोलीस ठाण्याचे सुशोभिकरण केल्याच्या प्रकरणात पारनेरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल अहमदनगरचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केला आहे. गाडे सध्या राहुरी येथे कार्यरत आहेत.यापूर्वी पोलीस अधीक्षकांतर्फे बनावट हिशोब व चौकशी अहवाल खंडपीठात सादर केला होता. त्यावर खंडपीठाने अधीक्षक सिंधू यांना स्वत: खंडपीठात हजर राहून याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. या खुलाशाने समाधान न झाल्याने याबाबत नाराजी व्यक्त करून अहवालावर कडक शब्दात ताशेरे मारले होते. तसेच नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी याबाबत फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार ३ मे रोजी फेरचौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. १३ जूनला फेरचौकशी अहवालावर सुनावणी झाली. निघोजचे सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती.पारनेर, निघोज पोलीस ठाण्यांच्या नूतनीकरण व सुशोभिकरणासाठी सामान्य जनतेकडून साहित्य किंवा देणग्या स्वीकारण्याची परवानगी आवश्यक असताना ती घेतली नाही. स्वीकारलेले साहित्य व देणग्यांचा स्वतंत्र हिशोब, रोजकिर्द किंवा रेकॉर्ड ठेवले नाही.कोणत्याही प्रकारची वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी केलेले काम बेकायदेशीर आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर नागरी सेवा कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविल्याचे अधीक्षक सिंधू यांनी खंडपीठास सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करीत न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्या. के. के. सोनावणे यांनी ही याचिका निकाली काढली.गाडे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक कोणती कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे. कवाद यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिक्यकाळे यांनी, तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.पोलीस अधीक्षकांच्या अहवालावर आम्ही समाधानी आहोत. दोषींवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करणार आहे.-रामदास घावटे,बबन कवाद, याचिकाकर्ते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर