शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिकेतही भाजपाचा स्वबळाचा नारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:51 IST

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्दे२०१८ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भाजपाने फुंकले रणशिंगभाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णयमिरा-भाईंदरमध्ये यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा

अहमदनगर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. आज दुपारी गांधी मैदानातील भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनीआगामी महानगरपालिका स्वबळावर लढून महापौर भाजपाचा करण्याचा ठराव मांडला. त्यास उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अनुमोदन दिले तर उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मिरा-भाईंदरमध्ये भाजपाने मिळविलेल्या यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा करण्यात आला. यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, विकासाच्या मुद्यावर भाजपा निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकत आहे. भाजपा संपूर्ण राज्यात मिळवत असलेल्या यशामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.उपमहापौर छिंदम म्हणाले, २५ वर्षे शिवसेनेचा आमदार नगरमध्ये होता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांना महापौरपद मिळाले. मात्र आजपर्यंत भाजप यापासून लांब आहे. आता मात्र भाजपला नगर शहरामधील सर्व निवडणुका जिंकण्याची मोठी संधी आहे.  यासाठी २०१८ ला नगरच्या महापालिकेला सामोरे जायचे आहे. ही निवडणुक आपण स्वबळावर लढणार असून त्यासाठी नियोजन करत आहोत.  सुवेंद्र गांधी म्हणाले, भाजपाच्या सरकारमुळे अच्छे दिन आले आहेत. जनता उत्स्फुर्तपणे भाजपाच्या मागे उभी आहे. नगरमध्येही  शहर भारतीय जनता पार्टी चांगले काम करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी तर आभार नरेश चव्हाण यांनी मानले.  यावेळी विश्वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भोरे, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, अविनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदिप पवार, सुनिल सकट, जालिदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे उपस्थित होते