शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून देशात कंपनीराज आणण्याचा भाजपाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:15 IST

अकोले : देशातील शेती, शिक्षण, आरोग्य याचे कंपनीकरण करण्याचा भाजपाचा घाट असून शेतकरी उद्ध्वस्त करून उद्योगपतींच्या हातात देश सोपविण्याचा ...

अकोले : देशातील शेती, शिक्षण, आरोग्य याचे कंपनीकरण करण्याचा भाजपाचा घाट असून शेतकरी उद्ध्वस्त करून उद्योगपतींच्या हातात देश सोपविण्याचा घाट केंद्र सरकारने आखला आहे, अशी टीका मधुकर नवले यांनी केली.

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अकोले येथील अभिनव शिक्षण संकुल येथे पत्रकार परिषद घेऊन मधुकर नवले, मीनानाथ पांडे, रमेश जगताप, मदन पथवे, विक्रम नवले यांनी आपली भूमिका मांडली. नवले म्हणाले, पुरोगामी डाव्या विचारसरणीच्या मुशीत राजकीय पिंड पोसला गेल्याने भाजपचे विचार कधीच मनाला शिवले नाहीत, पण केवळ पिचड यांच्या व्यक्तिगत प्रेमापोटी आपण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्यासपीठावर होतो. काँग्रेस विचारांशी पूर्वीच नाळ जोडली असून तालुक्यातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण पक्ष बदल केला आहे. स्वगृही परतल्याचे समाधान वाटते. महाआघाडीचा धर्म पाळून भविष्यातील निवडणुकांना सामोरे जाऊ, असे नवले म्हणाले.

...........

राष्ट्रवादीत सन्मान मिळाला नाही - पांडे

राष्ट्रवादीत चाळीस वर्षांत कार्यकर्त्यांना सन्मान, प्रतिष्ठा मिळाली नाही. राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाने ती परंपरा पुढे कायम ठेवली. राष्ट्रवादीत सन्मान मिळत नसल्याने आपण पक्ष सोडला, अशी खंत मीनानाथ पांडे, मदन पथवे यांनी व्यक्त केली. निळवंडेचे भूमिगत बंद पाईप कालवे ही मागणी चुकीचीच होती, असा टोला लगावत ३२ गाव पाणीपुरवठा योजना, तालुक्यातील रस्ते, क्रीडासंकुल, नदीपात्रातील प्रोफाइल वॉल, निळवंडे कालवेग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.